caw.jpg
caw.jpg 
नाशिक

दुर्देवी! रात्री घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांने फोडला हंबरडा; पावलांच्या ठशांवरुन खुलासा

रवींद्र मोरे

नाशिक/सटाणा : (बिजोरसे) रात्रीच्या वेळीच घडली घटना. सकाळी रामराव मोरे नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेले. रात्री दिसलेले वासरू सकाळी थेट दिसले मृतावस्थेतच. आजूबाजूच्या पावलांच्या ठशाने झाला खुलासा. वाचा काय घडले?

असा आहे प्रकार

गुरुवारी (ता. 29) बिजोरसे येथील गावाजवळच शेत मोराणे शिवारात गट नं.64 शेतकरी रामराव शिवराम मोरे नेहमीप्रमाणे सकाळी गाईचे दूध काढण्यासाठी गेले असता समोरील दृश्य पाहून हादरले. काही क्षणासाठी ते स्तब्धच झाले. रात्री दिसलेले वासरू सकाळी थेट मृतावस्थेत बघून त्यांना धक्काच बसला. वासरु नेमके कसे मेले? या विचाराने त्यांचे डोळे पाणावले. जोरात हंबरडा फोडल्याने आजूबाजूचे शेतकरी गोळा झाले. त्यांनी कांद्याच्या शिवारामध्ये पावलांच्या खुणा दिसल्या. कांद्याचे शेत ओले असल्याने ठसे उमटले दिसल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला हे स्पष्ट झाले. शेतकरी रामराव मोरे व पप्पू मोरे यांनी वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी श्रीमती आर एच आहीरे व राजेन्द्र साळुंखे हे कर्मचारी उपस्थित झाले. त्यांनी पंचनामा करत तिथे जमलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी संवाद साधला. 

पिंजरा लावण्याची मागणी

रात्री शेतीला पाणी देण्यासाठी उभे राहावे लागते. तसेच काद्यांना दोन पैसे मिळत असल्याने कांदा चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी सध्या शेतात पहारेकरीची भूमिका पार पाडत आहे. सर्व बाजूंनी धोका वाढला आहे. यात जीवितहानी झाल्यास तर याला जबाबदार कोण? गेल्या महिन्यात ही मोरणेगावाजवळ गुलाब मोरे यांचे ही दोन वासरांचा फडशा पाडला. तेव्हा कोणीही मनावर घेतले नाही. तसेच अधून-मधून अंबासन शिवाराजवळच असल्याने तिथेही बिबट्याचे दर्शन झाले. तरी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT