corona-test.jpg 
नाशिक

प्रशासनाकडून दाव्याचे खंडन! जळगावहून आलेले ॲन्टिजेन किट खराब; वाचा सविस्तर

विक्रांत मते

नाशिक : शहरात रॅपिड ॲन्टिजेन किटचा तुटवडा भासू लागल्यानंतर महापालिकेने नोंदविलेल्या नवीन २५ हजार ऑर्डरपैकी पाच हजार किट महापालिकेला प्राप्त झाल्या. जळगाव महापालिका व सिव्हिल हॉस्पिटलला दिलेल्या अठरा हजार किटपैकी अडीच हजार किट नाशिक महापालिकेला परत मिळाल्या. मात्र, त्या खराब असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

प्रशासनाकडून दाव्याचे खंडन 

प्रशासनाकडून याचे खंडन करताना वेगळ्या कंपनीच्या किट आल्याने त्या वापरण्याची पद्धत वेगळी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नाशिक महापालिकेने एक लाख रॅपिड ॲन्टिजेन किट मागविल्या होत्या. २४ जुलैपासून शहरात मिशन झीरो अभियान राबविताना त्यात मोठ्या प्रमाणात या किटचा उपयोग झाला. परंतु त्याच काळात जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तेथील जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन व महापालिका आयुक्तांकडून महापालिकेकडे रॅपिड किटची मागणी करण्यात आली होती. 

अठरा हजार किटवरून राजकारण रंगले

मानवी दृष्टिकोनातून नाशिक महापालिकेने अठरा हजार किट दिल्याने त्यावरून राजकारण रंगले. महापालिका प्रशासनाने कोणाची परवानगी घेतली, किटबाबत विचारणा केली का, असे अनेक प्रश्न स्थायी समितीमध्ये विचारण्यात आले. प्रशासनाने जळगावसाठी दिलेल्या किटपैकी अडीच हजार किट परत आल्या. नाशिक महापालिकेने ऑर्डर दिलेल्या २५ हजारांपैकी पाच हजार किट प्राप्त झाल्याचे स्पष्टीकरण दिले.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT