fraud.jpg 
नाशिक

महिनाभरापूर्वीच आखला होता प्लॅन; स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने बोलावले; अन् नंतर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : महिनाभरापूर्वीच आखला होता प्लॅन. ''मला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे. तुम्ही इकडेच येऊन समजवले तर बरे होईल, येण्या-जाण्याचा खर्च मी देतो'',म्हणत त्याला बेळगाववरुन नाशिककला बोलावून घेतले. मात्र डोक्यात दुसरंच काहीतरी शिजत होते. धक्कादायक प्रकार 

अशी घडली घटना

अभिजीत श्रीकांत महेंद्रकर (35, रा. बेळगाव) व त्यांचे मित्र प्रविण कुमार खोत हे नाशिकला आले होते. संशयितांनी महिनाभरापुर्वीच अभिजीत यांची ओळख करून स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांना बेळगावहून नाशिकला बोलवले. अभिजीत व मित्र प्रविण दोघेजण महात्मागांधी रोडवरील एका हॉटेलात थांबले. शुक्रवारी (ता. 4) रोजी दुपारी महेश थोरात याने कारमध्ये बसवून घोटी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नेले. तेथे गेल्यानंतर संशयित अग्रवाल याने अभिजीत यांच्याकडून स्टॉक मार्केटची माहिती समजून घेतली. त्यानंतर गोपाळ अग्रवाल याने दोघांनाही शितपेय दिले, मात्र ते पिल्याने दोघांनाही गुंगी आली. दरम्यान, गोपाळ अग्रवाल यांच्या सांगण्यावरुन तेथील बाऊन्सर संभाजी पवार, सचीन भोसले, महेश थोरात यांनी दोघांना नाशिकला सोडून देण्याच्या बहाण्याने घोटी येथील जंगलात नेले व तेथे संभाजी पवार याने पिस्तुलीचा धाक दाखवून दोघांकडील रोकड, लॅपटॉप, मोबाइल, पाकिट अशा 80 हजार रूपयांच्या किंमती चीजवस्तू लुटल्या. 

संशयितांनी लॅपटॉप अभिजीत यांच्या पुणे येथील मित्राकडे पोहचवला, मात्र पैसे, महत्वाची कागदपत्रे, मोबाइल दिले नाही. याप्रकरणी जबरी चोरीची फिर्याद दाखल केली असून सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT