A police officer guiding a meeting of police teams at a police station.  esakal
नाशिक

Nashik News : तरुणाईच्या मदतीने चोरट्यांवर राहणार वॉच! एक रात्र गावासाठी अभियान...

अजित देसाई

Nashik News : चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांनी ग्रामीण भागातील रहिवासी सुरक्षित राहिलेले नाहीत. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 'एक रात्र गावासाठी...' हे अभियान राबवले जाणार आहे.

हद्दीतील ४४ गावांमध्ये ग्रामरक्षक दलाची पुनर्बांधणी करण्यात येत असून गावातील तरुणांच्या मदतीने चोऱ्या, घरफोड्या यासह विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांना नियंत्रित केले जाणार आहे. (campaign One night for village is going to be implemented in jurisdiction of Vavi police station nashik news)

इंग्रजकाळापासून स्थापना असणाऱ्या वावी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील ४४ गावे येतात. अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, निफाड या तालुक्यांच्या सीमादरम्यान वावी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र पसरले आहे. नव्याने बनलेला समृद्धी महामार्ग, नाशिक-पुणे आणि सिन्नर- शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचा तालुक्यातील मोठा टप्पा याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जातो.

विस्तार आणि कामांचा पसारा मोठा असला तरी आज घडीला दोन अधिकारी आणि 33 कर्मचाऱ्यांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा भार आहे. अलीकडच्या काही महिन्यात चोऱ्या घरफोड्याचे सत्र सुरू राहिले असून इतरही गुन्हेगारी कारवाया पोलिसांच्या कार्यक्षमतेचा कस आणणाऱ्या ठरत आहेत.

गावागावात होणाऱ्या चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटना नित्याच्या बनल्या असल्याने गुन्हेगारांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळे आता जनतेच्या माध्यमातूनच या घटनांवर नियंत्रण आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी सामान्य नागरिकांत लपलेल्या पोलिसाची मदत घेण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी वावी पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये ग्रामरक्षक दलांची पुनर्बांधणी हाती घेतली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोऱ्या आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रणासाठी 'एक रात्र गावासाठी...' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येऊन रात्रीच्या वेळी गावांमध्ये स्थानिक तरुणांची गस्ती पथके तयार करण्यात येत आहेत.

या गस्तीपथकातील सभासदांना पोलिसांकडून विशेष ओळखपत्रे दिली जाणार आहेत. रात्री ठरवून दिलेल्या विभागात हे तरुण गस्त घालून गावातील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तांचे रक्षण करणार आहेत.

मार्गदर्शक सूचना जारी

नागरिकांनी दिवसा आणि रात्री आपल्या मालमत्ता आणि जीवित रक्षणासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात वावी पोलिस ठाणे स्तरावरून विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे फ्लेक्स गावोगावी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींची मदत घेतली जाणार आहे.

वावी पोलिस ठाण्यात सरपंच आणि पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत यांचा सक्रिय सहभाग मिळावा यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पोलिसांकडून पत्र देण्यात आले. त्यात डिजिटल फ्लेक्स लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

"डिजिटल फ्लेक्स गावागावात दर्शनी भागात लावण्यात येतील. त्यात नागरिकांनी मालमत्तांच्या रक्षणासाठी काळजी घेण्यासाठी सुमारे २५ मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. गावात अनोळखी व्यक्तींचा वावर टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला पाहिजे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास सामान्य नागरिकांनी थेट संपर्क साधावा.

यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. गुन्हेगारी सोबतच दारू विक्री सारखे अवैध व्यवसाय, गुटखा व अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सामान्य नागरिकांची मदत घेतली जाणार आहे." - चेतन लोखंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT