Accidental Vehicle esakal
नाशिक

Nashik News : वणी- सापुतारा रस्त्यावर कारचा अपघात; 3 ठार, एक गंभीर जखमी

दिगंबर पाटाेळे

वणी (नाशिक) : वणी- सापुतारा महामार्गावर,चौसाळे फाट्यानजीक व्हेर्ना कार रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात होऊन दोन युवती व एक युवक मयत झाले असुन एक जण गंभीर जखमी आहे. (Car accident on Vani Saputara road 3 killed one seriously injured Nashik News)

याबाबत वणी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की आज मंगळवार दि.२८फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वणी- सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्या नजीक व्हर्ना कार भरधाव वेगात वणी बाजुकडून सापूताऱ्याकडे जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटून सदर कार रस्त्याच्या खाली जाऊन अपघात झाला.

सदर अपघातात अंजली राकेश सिंग वय २३ वर्षे रा. सातपुर, नाशिक, नोमान चौधरी वय २१ वर्षे रा. सातपुर अंबड लिंक रोड नाशिक व सृष्टी नरेश भगत वय २२ वर्षे रा. रामबाज स्क्वेअर, नागपुर हे तीघे मयत झाले आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

तर अजय गौतम वय २० वर्षे रा. सातपुर लिंक रोड नाशिक हा जखमी झालेला आहे. जखमीस पुढील उपचाराकरिता नाशिक जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वणी पोलिसात सुरू होते.

पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Telangana Politics : तेलंगणच्या राजकारणात कन्येचे वडिलांना आव्हान; ‘बीआरएस’ला कविता यांची ‘टीआरएस’ धक्का देणार?

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

विदर्भात उष्णतेची लाट कायम; सोमवारी अमरावती सर्वाधिक हॉट, ४६.६ अशं तापमानाची नोंद; अकोल्याला टाकलं मागे...

SCROLL FOR NEXT