nandgaon car 1.png 
नाशिक

थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संजीव निकम

नाशिक / नांदगाव  : बुधवारी (ता.१६) रात्री हिसवळ खुर्द येथील गावानजीकच्या द्वारका नदीला पूर आल्याने नदीवरील पुलावरून बळजबरीने पुलावरून  वाहन चालविण्याच्या प्रयत्नात अल्टो गाडी वाहून गेली. ही थरारक दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

थरारक दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद; काय घडले?

हिसवळ खुर्द येथील एक व्यक्ती हा गावाकडे रात्री अल्टोने येत होता.याच सुमारास भालूर मोहेगाव परिसरातील प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे या भागातील लहानमोठे तलाव बंधारे ओसंडून वाहू लागल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर पाणी आले होते. हिसवळ खुर्दजवळही द्वारका नदीला पूर आला.या पूरातून खडी वाहणाऱ्या डंपरचालकाने आपले वाहन काढले. ते सुरक्षित गेल्याचे बघून पाठीमागे असलेल्या अल्टो कारचालक यानेही आपली गाडी टाकली.

पूराच्या आवेगापुढे निभाव न लागल्यामुळे अल्टो कार गटागंळ्या खावू लागली.व वाहू लागली. समाधानने दरवाजा उघडून बाहेर उडी टाकली. गावकऱ्यांनी त्याला पुरातून बाहेर काढले त्यामुळे तो बचावला मात्र त्याच्यासोबत असलेला एक सहप्रवासी मात्र वाहत्या पाण्यात वाहनासोबत वाहून गेला. हा प्रवासी मनमाड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे .त्याचा शोध घेतला जात आहे.

एक बचावला तर दुसरा वाहून गेला.

अल्टोत दोन जण होते. यापैकी एक बचावला तर दुसरा पूराच्या लोंढ्यात अडकलेल्या अल्टोसह  वाहून गेला त्याचा शोध घेतला जात आहे. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा बंडखोरासह कार्यकर्त्यांना दणका, ६९ जणांचं निलंबन; शिस्तभंग केल्यास सहानुभूती नाही, प्रदेशाध्यक्षांची कारवाई

दुर्दैवी घटना! लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघातात मृत्यू; लग्नासाठी पळापळी अन् काळाचा घाला..

अमेरिकेचं बांगलादेशला गिफ्ट, भारतासमोर नवं संकट; वस्त्रोद्योगाला बसू शकतो फटका

T20 World Cup: पाकिस्तानी गोलंदाजाच्या मदतीला R Ashwin! टीका करणाऱ्या भारतीय खेळाडूलाच झापलं

Amravati Crime : चार महिने पाच जणांकडून अत्याचार; शाळकरी मुलगी राहिली गर्भवती, दोघे आरोपी अल्पवयीन

SCROLL FOR NEXT