crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : कुत्रा भुंकला म्हणून फोडल्या गाड्या अन् पोलीसांनी झिंगाट संशयिताला ठोकल्या बेड्या!

नरेश हाळणोर

नाशिक : गांजा अन्‌ दारूच्या नशेत झिंग झालेल्या संशयितावर भटका कुत्रा भुंकला. भुंकणार्या कुत्र्यावर झिंगाट असलेल्या संशयिताने दगड भिरकावला. दगड कुत्र्याला लागला नाही, पण त्याचा राग संशयिताने रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर काढत दगड मारून काचा फोडल्या.

या झिंगाट संशयिताला शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आकाश निवृत्ती जगताप (२१, रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. (Cars windows smashed police arrested drunkard man Nashik Crime News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

सातपूर कॉलनीत गेल्या मंगळवारी (ता. १७) रात्री रवींद्र श्रीकृष्ण सगरे यांच्या वॅगेनार कारची (एमएच १५ इबी २७३०) तर, रुबी संजिद आलमशाह यांच्या ह्युंडाई कारची (एमएच १५ डीएम १४६५) काच फोडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सातपूर पोलिसांसह शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. युनिट दोनचे हवालदार राजेंद्र घुमरे, संजय सानप यांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत असताना संशयित आकाश जगताप यांची माहिती मिळाली.

पोलिसांनी आकाशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढच्या कारवाईसाठी त्यास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरील कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, यशवंत बेंडकोळी, राजेंद्र घुमरे, संजय सानप, सुनील आहेर प्रशांत वालझाडे, संतोष ठाकूर यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT