malegaon-municipal-corporat.jpg 
नाशिक

मालेगाव : महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच आयुक्त "इन एक्शन मोड"!.. 33 महापालिका कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असतांना मनपाच्या कोवीड केअर सेंटर व क्वारंटाईन रुग्णालयाबाहेर सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक दिलेले 33 कर्मचारी कामावर हजर झाले नाही. दरम्यान अत्यावश्यक कामावर रूजू न झाल्याने त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा कर्मचारींवर कोरोना साथ सुरू झाल्यानंतर प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे. 

 33 कर्मचाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल
मनपाच्या वाँचमन व शिपाई संवर्गातील 33 कर्मचाऱ्यांना जीवन हॉस्पिटल , मन्सूरा हॉस्पिटल, एटीटी हायस्कूल, मालेगाव हायस्कूल, कर्मवीर या. ना. जाधव हायस्कूल यासह विविध रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरवर सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आले. नेमणूक देण्यात आल्या नंतरही संबांधित कर्मचारी याठिकाणी कामावर हजार न झाल्याने अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलीस ठाण्यात या 33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मनपा अधिकारी कर्मचारींमध्ये खळबळ उडाली आहे.महिनाभरापासून कामाला दांडी मारत कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सुरक्षारक्षकांविरुद्ध येथील किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आयुक्तपदाचा पदभार त्र्यंबक कासार यांनी स्वीकारताच कारवाई

मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून आज पुन्हा (ता.१) तब्बल १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. यात चार जवान हे राज्य राखीव पोलीस दलाचे आहेत यामुले जिल्ह्यात कोरोनाचे २९७ रुग्ण झाले आहेत तर यात मालेगावात २७४ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात २९७ रुग्णांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक व जिल्हास्तरीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली जात आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार त्र्यंबक कासार यांनी स्वीकारताच तातडीने आढावा बैठक घेत प्रथम आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांची साफसफाई करत कारवाईचा बडगा उगारला आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT