crime news esakal
नाशिक

घरात घुसून मारहाण करणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : तक्रारदार सरफराज पठाण यांच्या घरात सोमवार (ता. १) काही महिला व पुरुषांनी जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. श्री. पठाण यांच्या नातेवाइकांची अल्पवयीन मुलीस खडकाळी येथील तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. (case has been filed against women who broke into house beat them up nashik Latest Crime News)

त्याविरुद्ध पठाण यांनी मुलीच्या कुटुंबीयास तक्रार देण्यासाठी मदत केली होती. त्यावरून भद्रकाली पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, यासाठी सरफराज पठाण यांना धमकी मिळाली होती.

पठाण धमकीस घाबरले नाही. याचा राग मनात धरून साजिया सलाउद्दीन शेख, नसरीन जमीर शेख, जमीर शेख, शहजाद, जुफियान सलाउद्दीन शेख, फैजान सलाउद्दीन शेख यांच्यासह अज्ञात दोन महिलांनी पठाण व त्यांच्या पत्नीस मारहाण करून शिवीगाळ केली.

गर्दीची संधी साधत सोन्याचे कानातील, रोकड आणि मोबाईल, असा सुमारे ३३ हजार ८०० ऐवज लंपास झाला. याबाबत भद्रकाली पोलिसांत सशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT