Malegaon Crime News 
नाशिक

वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : पोलिस हे सामान्यांच्या रक्षणासाठी काम करतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळाच तर जीवाची परवा न करता ते दिवसरात्र जनतेच्या सेवेत असल्याचे आपण पाहातो. मात्र मालेगावात पोलिस ठाण्यातच पोलिसाच्या कानशिलात लगवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मालेगाव येथील तालुका पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या संशयिताशी लॉकअप गार्डवर ड्यूटीसाठी असलेल्या पोलिसाची परवानगी न घेता बोलताना हटकले. एवढ्यावर दोघांनी पोलिस शिपायाच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २९) सायंकाळी घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमके काय घडले?

पोलिस शिपाई तानाजी शिंदे तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअप गार्डवर होते. या वेळी लॉकअपमधील खुनाच्या प्रयत्नातील संशयिताला कैलास शिंदे, गणेश शिंदे (दोघे रा. शेंदुर्णी) भेटण्यासाठी गेले. दोघांनी शिंदे यांची परवानगी न घेता ते कोठडीतील संशयितांशी बोलू लागले. शिंदे यांनी त्यांना हटकत संशयितांना भेटता येणार नाही, असे सांगितले. त्याचा राग आल्याने कैलास व गणेश यांनी शिंदे यांच्या शर्टाची कॉलर पकडून झटापट केली. एकाने थेट डाव्या कानशिलात लगावली. शिंदे यांच्या तक्रारीवरून कैलास शिंदे, गणेश शिंदे यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांत शासकीय कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेख हसीना बांगलादेशात परतणार? नव्या पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी दिल्लीतील दूतावासाकडे अर्ज

Pune Air Pollution: पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाढलं वायू प्रदूषण; श्वसनाचे आजार टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Trump Iran War : अमेरिकेतील पराभवानंतर ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? इराणचा आक्रमक पवित्रा; इस्रायलवरून थेट निशाणा

विषारी हवेपासून बचावासाठी टॉप 5 बजेट Air Purifiers; किंमत 4,499 रुपयांपासून सुरु..पाहा फीचर्स आणि ऑफर्स!

IND vs NZ Test : भारताच्या पाच खेळाडूंची शेवटच्या दोन वन डे सामन्यांतून माघार; नेमकं कारण काय? मग त्यांच्या जागी कोण येणार?

SCROLL FOR NEXT