Crime esakal
नाशिक

Nashik Crime: रोकड, मोबाईल अन सोन्याचा ऐवज लुटला; मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारातील घटना

मुंबई-नाशिक महामार्गावर अज्ञात लुटारूंनी मुंबईहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या कारचालकाला सोमवारी (ता. १) पहाटे कोयत्याचा धाक दाखवून मारहाण व शिवीगाळ केली.

सकाळ वृत्तसेवा

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर अज्ञात लुटारूंनी मुंबईहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या कारचालकाला सोमवारी (ता. १) पहाटे कोयत्याचा धाक दाखवून मारहाण व शिवीगाळ केली. कारमधील प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोकड व मोबाईल घेऊन लुटारूंनी पलायन केले.

मुंढेगाव शिवारात महामार्गावर मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकाराने महामार्गावरील वाहनचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Cash mobiles gold stolen Incident at Mundhegaon Shivara on Mumbai Agra highway Nashik Crime)

मुंढेगाव शिवारात रेल्वे ब्रिजच्या अलीकडे तिघा लुटारूंनी मुंबईहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी कार (एमएच ०४, डीएम ८०५१)चालकाला कोयत्याचा धाक दाखवून कार उभी करण्यास भाग पाडले. रात्रीची वेळ असल्याने चालक व त्याच्या साथीदाराला संशयितांनी मारहाण व शिवीगाळ केली.

भीतीपोटी चालक किरण मल्लिकार्जुन कावळे (वय ३०, रा. मुंब्रादेवी, ठाणे) व त्याच्या साथीदारांकडून लुटारूंनी चार मोबाईल, अंगठी, सोन्याची चैन, रोकड, असा जवळपास ७० ते ८० हजारांचा ऐवज हिसकावून पोबारा केला.

याबाबत माहिती मिळताच घोटीचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, अनिल धुमसे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पंकज दराडे, कटारे आदींनी घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध घेतला.

याबाबत कारचालक किरण कावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. १) दिवसभर घोटी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लुटारूंचा शोध घेत होते. तिघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT