Staff along with ophthalmologist during the camp conducted under Motibindu Mukt Abhiyan at District Hospital. esakal
नाशिक

Cataract surgery : एका दिवसात 133 रुग्‍णांची मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील जिल्‍हा रुग्‍णालयात गेल्‍या बुधवारी (ता.२५) बिनटाका कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत जिल्ह्या‍तील तब्‍बल १३३ रुग्‍णांवर एका दिवसात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.नेत्रशल्‍यचिकित्‍सक डॉ. राजश्री पाटील, डॉ. शशिकांत आवारी यांच्‍यासह डॉक्‍टरांच्‍या टीमने ही कामगिरी केली आहे.

बहुतांश रुग्‍ण हे ग्रामीण, दुर्गम भागातील किंवा आर्थिकदृष्टया मागास वर्गातील होते. या शिबिराच्‍या माध्यमातून झालेल्‍या शस्‍त्रक्रियेमुळे सर्व रुग्‍णांची नेत्रदोषातून मुक्‍तता होण्यास मदत झालेली आहे. एका दिवसात तब्‍बल १३३ शस्‍त्रक्रिया करताना अनोखा विक्रम डॉक्‍टरांनी नोंदविलेला आहे.

जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांच्‍यासह डॉ. रोहन बोरसे, डॉ. सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, पदव्‍युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. के. झा, मेट्रन शुभांगी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

तपासणीनंतर आवश्‍यक त्‍या रुग्‍णांची शस्‍त्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व १३३ शस्त्रक्रिया डॉ. राजश्री कुटे, डॉ. शशिकांत आवारी यांनी केल्या आहेत. त्‍यांना फिजिशियन डॉ. प्रतीक भांगरे, डॉ. चेवले, डॉ. महेश ठाकरे, भूलतज्ज्ञ डॉ. संध्या पाटील यांचे सहकार्य लाभले.

यशस्वितेसाठी श्रीमती चौधरी, श्रीमती गुडघे, डॉ. कल्याणी अहिरे, डॉ. अक्षय जाधव, साहेबराव गोपाळ, मंगेश वाघ, श्री. पाटील, सुनील चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT