नाशिक

Anant Chaturdashi Eid : विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही, ड्रोन ठेवणार ‘वॉच’; ईद-ए-मिलाद जुलूस मार्गावरही 50 कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा

Anant Chaturdashi Eid : येत्या गुरुवारी (ता. २८) गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. विसर्जन मिरवणुकीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान होऊ नये यासाठी विसर्जन मार्गावर तब्बल ९६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे, चार ड्रोनच्या माध्यमातून मिरवणुकीवर ‘वॉच’ केले जाणार आहेत. दरम्यान, दुसर्या दिवशी होणार्या ईद-ए-मिलाद जुलूस मिरवणूक मार्गावरही ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. (CCTV drone watch on anant chaturdashi and eid nashik news)

लाडक्या गणरायाचे गेल्या १९ तारखेला मोठ्या उत्साहात आगमन झाले होते. आता, येत्या गुरुवारी (ता. २८) लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२६) भद्रकाली पोलिस ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलिस अधिकार्यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना पाेलिसांनी वेळेत मिरवणूक सुरु करावी, दोन मंडळांमध्ये अंतर जास्त ठेवू नये, ढोलवादकांची संख्या मर्यादीत असावी आदी सूचना दिल्या. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

तसेच मिरवणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलीसांतर्फे ७० तर, स्मार्ट सिटीमार्फत २६ असे ९६ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. त्यांचे नियंत्रण पोलिस नियंत्रण कक्षातून होणार आहे. त्याचप्रमाणे, चार ड्रोनही मिरवणुकीवर करडी नजर ठेवून असतील. त्यामुळे विसर्जन मार्गातील मंडळांच्या हालचालीवर पोलिसांना बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे.

जुलूस मार्गावर ५० कॅमेरे

येत्या शुक्रवारी (ता. २९) ईद-ए-मिलास निमित्त मुस्लिम बांधवांकडून जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जुलूस मिरवणूक मार्गावरही ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यमावरून जुलूसवर नजर ठेवली जाणार आहे. जुलूस मार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

* विसर्जन मार्गावर ९६ सीसीटीव्ही कॅमेरे

* चार ड्रोनमार्फत विसर्जन मार्गावर नजर

* मिरवणुकीत सहभागी मंडळांना पाेलिसांच्या सूचना

* मर्यादित ढोलवादक

* एका मंडळास २० मिनिटांचा वेळ

* प्रत्येक मंडळास एक पोलीस अधिकारी

* श्वानपथकामार्फत होणार विसर्जन मार्गाची तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सोलापूरात अवकाळी पावासाची जोरदार हजेरी

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT