chain snatching latest crime news esakal
नाशिक

Nashik Crime : बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास

नरेश हाळणोर

नाशिक : रिक्षा वा बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने वा पर्समधील रोकड लंपास करण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना, आता बसमध्ये चढताना गर्दीचा गैरफायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली.

हा प्रकार शालिमार चौकात घडला असून, याबाबत भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (chain snatching of woman while boarding bus nashik crime Latest Marathi News)

ममता कुलकर्णी (रा. वास्तू क्लासिक सोसायटी, गणेशनगर, काठे गल्ली, द्वारका) शनिवारी (ता. ३०) सायंकाळी पाचच्या सुमारास द्वारका येथे जाण्यासाठी शालिमार चौकातील शहर बसथांब्यावर आल्या.

द्वारकाकडे जाणाऱ्या बसमध्ये त्या चढत असताना, गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत हातोहात लंपास केली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक एस. आर. नाईक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT