key chain.jpg
key chain.jpg 
नाशिक

चक्क थेट संपर्क टाळण्यासाठी 'कि-चेन'?...'या' विद्यार्थ्यांची आयडियाची कल्पना तर जाम भारी!

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (गणूर) कारखाने, ऑफिस, लिफ्ट, एटीएम आदी ठिकाणी आपल्या हातांचा थेट संपर्क वस्तूंना होऊ नये म्हणून चांदवड येथील नेमिनाथ जैन संस्थेतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी चैतन्य ठाकूर याने तयार केलेले अनोख "की-चेन' कोरोना संक्रमण टाळण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनिश्‍चित काळासाठी पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प ठेवणे विकसनशील भारताला परवडणारे नाही. यामुळे लॉकडाउन शिथिल केलेल्या भागात चैतन्य ठाकूरचे हे संशोधन कामी येणार आहे. 

थेट संपर्काला आळा बसून संक्रमण रोखणे शक्‍य

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील चैतन्यने थ्रीडी प्रींटिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट की-चेनची निर्मिती केली आहे. हे स्मार्ट की-चेन घर, कार, ऑफिस यातील सर्व दरवाजे उघडणे व बंद करण्यासाठी वापरता येईल. त्याचप्रमाणे एटीएम, लिफ्ट, सार्वजनिक कॉम्प्युटरसाठी वापर करता येणार आहे. या उपकरणाच्या सहाय्याने थेट संपर्काला आळा बसून संक्रमण रोखणे शक्‍य होणार आहे. की-चेनमध्ये टच सेन्सर्स बसविण्यात आल्याने बऱ्याच ठिकाणी याचा स्मार्ट वापर शक्‍य होणार आहे. या विद्यार्थ्यास प्रा. राहुलकुमार सोनार व प्रा. दीपक संचेती यांचे मार्गदर्शन लाभले. 

या समाजापयोगी संशोधनाबद्दल विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा यांनी चैतन्यचे कौतुक केले.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT