Chandanpuri Yatra esakal
नाशिक

Chandanpuri Yatra : देवांचे मुखवटे वाजत गाजत अहिरेंच्या घरी; रविवारपर्यंत राहणार भाविकांची गर्दी

प्रभाकर बच्छाव

येसगाव (जि. नाशिक) : चंदनपुरी यात्रेत अखेरच्या टप्प्यात गर्दीचा ओघ वाढत आहे. दररोज हजारो भाविक खंडेरावाच्या पायावर लीन होत आहेत. शहरासह कसमादे भागातील भाविकांचा राबता दिसून येत आहे.

गुरुवारी (ता.१९) सायंकाळी श्री खंडेराव महाराज, म्हाळसाबाई व बानूबाईचे मुखवटे पालखीतून कौतिक अहिरे यांच्या घरी सहवाद्य मिरवणुकीने नेण्यात आले. (Chandanpuri khandoba Yatra crowd of devotees will remain till Sunday nashik news)

मुखवटे १३ दिवस मंदिरात ठेवले जातात. मंदिरातून नेल्यानंतर यात्रेची सांगता होते. गुरुवारी सायंकाळी यात्रोत्सव सांगतेला आविष्कार भुसे सपत्नीक सह ११ जोडप्यांच्या हस्ते, मंदिरात महापूजा, आरती करण्यात आली.

यावेळी 'येळकोट येळकोट , जय मल्हारच्या 'गजरात देवांवर भंडारा व खोबऱ्याचा प्रसाद उधळण्यात झाली. इतर वाद्याबरोबर वाघ्या मुरळी यांच्या वाद्याने साथ देतात. देवाचे मुखवटे श्री. अहिरे यांच्या घरी जाण्यापूर्वी तुकाराम सूर्यवंशी यांच्यकडे मुखवटे आल्यानंतर तेथे अभिषेक, महापूजा, आरती धार्मिक कार्यक्रमासह भंडाऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला.

देवाचे मुखवटे श्री. अहिरेच्या घरी गेले असले तरी रविवारचे औचित्य साधून भाविक नवस फेडणे, कोटमा व तळी भरणे, देव भेटवणे तसेच नवदांपत्य मोठ्या प्रमाणात नवस फेडण्यासाठी येतात. शेवटच्या रविवारी (ता.२२) लाखावर भाविक येण्याची शक्यता आहे.

यात्रोत्सवात रोज गर्दी होत आहे. मंदिर परिसर दुमदुमून जात आहे. यात्रेनिमित्त अजूनही येथे व्यावसायिक व वाघ्या मुरळी यात्रेत ठाण मांडून आहेत.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

यात्रोत्सव सांगता व देव मंदिरातून घरी नेताना ट्रस्ट अध्यक्ष सतीश अहिरे, सरपंच विनोद शेलार, उपसरपंच सविता सोनवणे, डी. एफ. पाटील, अशोक अहिरे, एस. टी. अहिरे, बाबाजी शेलार, पुजारी मुरलीधर सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, रामकृष्ण सूर्यवंशी, वाघ्या मुरळी व असंख्य भाविक उपस्थित होते.

"यात्रोत्सव सांगता पर्यंत मशाल ज्योत प्रज्वलित राहते. पन्नास वाघ्या मुरळी कडून दहीभातचा कोटम भरून मशाल ज्योतला दहिभात चा नैवेद्य दाखवून ज्योत शांत केली जाते. रात्री आठ वाजता दीपमालांच्या दगडी दिव्यात सरकी तेल टाकून दिवे लावून प्रकाश देवांच्या मूर्तींना दाखविला जातो." - तुकाराम सूर्यवंशी, भगत, चंदनपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचे ‘म्युल अकाउंट’ रडारवर; पुणे पोलिसांची मोठी मोहीम; आठ दिवसांत १०० हून अधिक गुन्हे दाखल

Madhuri Elephant Return To Nandani Math : 'माधुरी हत्तीणी'च्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता! 13 सप्टेंबरची 'डेडलाईन'; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Live Marathi News Update : २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलनाचा इशारा; मनोज जरांगे यांची मोठी घोषणा

Mallikarjun Kharge Warrant : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने जारी केले वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण?

पीएचडी स्कॉलर ज्योतीचा विद्यापीठ कॅम्प्समध्ये शॉक लागून मृत्यू; कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई आणि भावाला नोकरीची घोषणा

SCROLL FOR NEXT