chandanpuri yatra.jpg 
नाशिक

चंदनपुरी यात्रोत्सवास प्रशासनाकडून परवानगी नाही; कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे संकट उभे 

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : कोरोनामुळे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास परवानगी नाकारल्याची माहिती प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली. इतिहासात प्रथमच यात्रोत्सव होणार नाही. दर वर्षी पौष पौर्णिमेला चंदनपुरीत १५ ते २० दिवस मोठा यात्रोत्सव होतो. या वर्षी २८ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरवात होणार होती. 

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे संकट उभे ठाकले
श्री खंडेरायाच्या यात्रोत्सवास पहिल्याच दिवशी दीड ते दोन लाख मल्हारभक्त हजेरी लावतात. याशिवाय १५ दिवस भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यात्रेत लहान-मोठी पाचशेपेक्षा अधिक दुकाने लावली जातात. राज्यात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे संकट उभे ठाकले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी चंदनपुरी यात्रोत्सवास परवानगी नाकारण्यात आल्याचे शर्मा यांनी कळविले आहे. राज्यात शासनाने लॉकडाउनचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. यात्रा, उरुस व इतर धार्मिक उत्सावांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होऊ शकतो अशा कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. यासंदर्भात चंदनपुरी ग्रामपंचायत व स्थानिक पोलिस प्रशासनाला माहिती कळविण्यात आली आहे. 

धार्मिक कार्यक्रम होणार 
यात्रोत्सव रद्द झाला असला तरी पौष पौर्णिमेला होणारे विविध धार्मिक कार्यक्रम मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. पौष पौर्णिमेला काठी व देवाच्या मुखवट्यांची मिरवणूक काढली जाते. देवाची आरती, तळी भरणे, कोटम भरणे आदींसह मंदिरातील धार्मिक कार्यक्रम होतील. यात्रोत्सव रद्द झाल्याने याचा फटका शेकडो व्यावसायिकांना बसणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT