Regional President Chandrasekhar Bawankule while interacting with a woman in the weekly market on Friday. esakal
नाशिक

Chandrashekhar Bawankule News: साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत भाजप पोहोचणार : चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

निफाड : आगामी सर्वच निवडणुकांमध्ये प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळावीत, यासाठी सुपर वॉरियरची नेमणुकीसाठी आलो आहे.

एका बूथच्या धर्तीवर तीन सुपर वॉरियर, असे ६०० सुपर वॉरियरांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबांशी संपर्क करण्याचा संकल्प केला आहे. (Chandrashekhar Bawankule statement BJP will reach three half lakh families in niphad samvad yatra bjp nashik political )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे ९ वर्षांतील कामे घरोघरी पोचविले जात आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ या सहा विधानसभेतील सुपर वॉरिअर्सची बैठक शुक्रवारी (ता. २४) येथील वैनतेय विद्यालयात झाली. बैठकीसाठी येथे आगमन झाल्यानंतर श्री. बावनकुळे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महामंत्री विजय चौधरी, आमदार डॉ. राहुल आहेर, रवी अनासपुरे, राजेंद्र गावित, जिल्हाध्यक्ष शंकर वाघ व सुनील बच्छाव, गुरूभाऊ कांदे उपस्थित होते.

बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पवार, जिल्हाध्यक्ष वाघ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी वैनतेय विद्यालयापासून संवाद यात्रा काढली.

त्यांनी आठवडेबाजारातील दुकानदार, मेन रोडवरील दुकानदार, व्यापारी, नागरिकांना केंद्रातील भाजप सरकारने केलेली विकासकामे व राबविलेल्या विविध योजनांची पत्रके वाटली व नागरिकांशी संवाद साधला. शनिचौकात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आनंद शिंदे, यतीन कदम, संजय सानप, भागवत बोरस्ते, सुवर्णा जगताप, संतोष केंद्रे, सतीश मोरे, केशव सुरवाडे, सारिका डेर्ले, निखिल पवार, सुधाकर पगार, आनंद शिंदे, पंढरीनाथ पीठे, संजय सानप, संजय गाजरे, गौरव वाघ, सचिन धारराव, छोटूकाका पानगव्हाणे, जनार्दन कराड, सुनील, मापारी, विजय शिंदे आदींसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या सर्वच आघाड्यांचे पदाधिकारी, बूथप्रमुख व सुपर वॉरियर्स उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT