Former Chairman Keda Aher felicitated Yogesh Aher and Deputy Chairman Abhiman Pawar for their unopposed election as Chairman of the Market Committee. Adjacent Authorized Officer Sujay Pote and Director esakal
नाशिक

Chandwad APMC : सभापती-उपसभापतींची बिनविरोध निवड; देवळ्यात ‘शेतकरी विकास’ची सत्ता

सकाळ वृत्तसेवा

Chandwad APMC : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वसमावेश अशा शेतकरी विकास पॅनलचे योगेश शांताराम आहेर यांची, तर उपसभापतीपदी अभिमन पवार यांची बिनविरोध निवड झाली. (Chandwad APMC Chairman Deputy Chairman elected unopposed power of shetkari vikas in deola nashik news)

सभापती-उपसभापती निवडीसाठी मंगळवारी (ता. २३) सकाळी दहाला प्राधिकृत अधिकारी सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. निर्धारित वेळेत सभापतीपदासाठी योगेश आहेर व उपसभापती पदासाठी अभिमन पवार यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले.

सभापतीपदासाठी सूचक म्हणून भाऊसाहेब पगार यांनी, तर अनुमोदक म्हणून धनश्री आहेर यांनी स्वाक्षरी केली. तसेच, उपसभापतीपदासाठी सूचक म्हणून दिलीप पाटील, तर अनुमोदक म्हणून शाहू शिरसाठ यांनी स्वाक्षरी केली.

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत प्राधिकृत अधिकारी श्री. पोटे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पॅनलचे नेते व माजी सभापती केदा आहेर, संचालक विजय सोनवणे, शिवाजी पवार, शिवाजी आहिरे, अभिजित निकम, विशाखा पवार,

दीपक बच्छाव, रेश्‍मा महाजन, भास्कर माळी, शीतल गुंजाळ, संजय शिंदे, निंबा धामणे, भावराव नवले, सचिव माणिक निकम आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती श्री. आहेर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सभापती-उपसभापती निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चांदवडला महाविकास आघाडी

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव यांची, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

बाजार समिती सभापती-ऊपसभापती निवडीसाठी तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २३) विशेष सभा झाली. त्यांना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी सहाय्य केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

सभापतीपदासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. जाधव यांचा, तर विरोधी गटातर्फे पंढरीनाथ खताळ यांचा अर्ज दाखल झाला होता. तसेच उपसभापतीपदासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे श्री. आहेर, तर प्रतिस्पर्धी गटातर्फे सुखदेव जाधव यांचा अर्ज दाखल झाला.

मात्र, त्यानंतर विरोधी गटाच्या दोन्ही संचालकांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. शिरिषकुमार कोतवाल, डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, विक्रमबाबा मार्कंड, सचिन अग्रवाल,

डॉ. वैशाली जाधव, मीनाताई शिरसाट, गणेश निंबाळकर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, वाल्मीक वानखेडे, योगेश ढोमसे, रविंद्र पवार, सुशील पलोड या वेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल आनंदोत्सव साजरा केला.

निवडीनंतर झालेल्या अभिनंदन सोहळ्यात शिवसेनेचे विलास भवर, डॉ. राजेंद्र दवंडे, कारभारी आहेर, संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष जाधव यांनी आभार मानले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT