sarpancha.jpg 
नाशिक

'...काल काय ऐकलं ते खरं हाय का?' 'चांदवड'च्या पोलीस पाटलाला अश्लील शेरेबाजी भोवणार!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : 'कसं काय पाटील बरं हाय का?'...काल काय ऐकलं ते खरं आहे का?...असं विचारण्याची वेळ सध्या चांदवडकरांवर आली आहे. निमित्त आहे समाजमाध्यमांत देवरगाव (ता. चांदवड) येथील पोलीस पाटील या शासनाच्या सेवकाने केलेल्या अश्लील शेरेबाजीचे...या पोलीस पाटलाला अश्लील शेरेबाजी भोवणार असल्याचे चित्र सद्या बघायला मिळत आहे.

नेमके काय घडले?

पोलीस पाटील म्हंटल की, गावची कायदा सुव्यवस्था राखण्यात मोलाची कामगिरी बजावणारा घटक. शासनाच्या या सेवकाकडून निरपेक्षपणे काम अपेक्षित असते मात्र ते दुरच पण थेट कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच उपस्थित होईल असे वर्तन केलंय माणिक शिंदे या देवरगाव (ता. चांदवड) येथील पोलीस पाटलांनी. अठरा "गावांचा राजपूत बाणा-01" या व्हाटसप ग्रुपवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्यावर अश्लील टिप्पणी केली. सदर टिप्पणीचे स्क्रीनशॉट राष्ट्रवादी काँग्रेस चांदवड पदाधिकाऱ्यांच्या हाती लागताच शासनाचा सेवक असलेल्या या पोलीस पाटलावर कारवाई होऊन त्याचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी चांदवड प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याकडे केली आहे. निवेदनावर दत्तात्रेय वाकचौरे, सुनील आहेर, नवनाथ आहेर, विक्रम जगताप, दीपक शिंदे, दशरथ ठाकरे, संदीप शिरसाठ, सुनील शिरसाठ, शशिकांत शिरसाठ, योगेश जाधव, संभाजी जाधव, बाळू जाधव, दीपक जाधव, ओमकार जाधव आदी राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.

विशेष म्हणजे ही शेरेबाजी थेट शरद पवार यांच्यावर केली गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी संतापले असून पोलीस पाटलाला तात्काळ पदावरून हटविण्याची मागणी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे केली आहे. दरम्यान शासकीय पदावर राहून राजकीय तसेच असंविधानिक शब्द वापरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या पोलीस पाटलावर प्रशासन काय कारवाई करेल याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT