Students protesting in the university sub-centre. esakal
नाशिक

Nashik News: विधी परीक्षेच्‍या वेळापत्रकात बदल करा; विद्यार्थ्यांनी उपकेंद्रात आंदोलन करत दिले निवेदन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधी अभ्यासक्रम असलेल्‍या एलएलबी आणि बीए एलएलबीच्‍या लेखी परीक्षा सलग असल्‍याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने वेळापत्रकात बदल करत सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. शुक्रवारी (ता.२३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्रात आंदोलन करताना समन्‍वयकांना निवेदन दिले. युवा नेते ॲड. अजिंक्‍य गिते यांच्‍या नेतृत्‍वाखाली आंदोलन कण्यात आले. (Change in schedule of legal exams students protested in sub centre gave statement Nashik News )

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

विद्यापीठाचे कुलगुरू यांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे, की १० डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एलएलबी, बीए एलएलबी अंतिम वर्षाच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या वेळापत्रकात पाच विषयांच्या परीक्षा सलग पाच दिवसात ठेवलेल्‍या आहेत. तीन तासांची परीक्षा देऊन विद्यार्थी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जातात.

त्यामुळे त्यांना शारीरिक आराम तसेच पुढच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्‍याने वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंता व असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या निकालावर दुष्परिणाम होण्यासह विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रासदेखील सहन करावा लागतो आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत वेळापत्रकामध्ये बदल करावा.

दोन परीक्षेच्या दरम्यान किमान दोन दिवसाचा वेळ विद्यार्थ्यांना द्यावा, अशी मागणी केली आहे. परीक्षा काही दिवसांतच सुरु होणार असल्‍याने येत्या दोन दिवसात वेळापत्रक बदल जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. मागणी पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व विधी शाखेच्या विद्यार्थ्यांद्वारे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT