smart raod parking.jpg 
नाशिक

आता 'पार्किंग'साठी नो टेन्शन!...घरबसल्या पार्किंगच्या जागेची निवड...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीतर्फे शहरात उभारलेल्या स्मार्ट पार्किंग वापरासाठी आता शुल्क अदा करावे लागणार असून, बुधवार (ता. 4) पासून दुचाकींसाठी पाच, तर चारचाकींसाठी प्रतितास दहा रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 

13 ठिकाणी ऑन स्ट्रीट व दोन ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग

शहरातील वाहन पार्किंग समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट कंपनीतर्फे 28 ठिकाणी ऑन स्ट्रीट, तर पाच ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर 13 ठिकाणी ऑन स्ट्रीट व दोन ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग राहील. बुधवार (ता. 4)पासून या ठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. पार्किंगला शिस्त लागण्यासाठी अनधिकृतरित्या गाडी पार्क केली तर टोइंग किंवा दंड आकारण्यात येईल. स्मार्ट पार्किंगवर चारचाकी वाहनांकरिता सेंसर्स लावले आहेत. कोणतीही चारचाकी स्मार्ट पार्किंगमध्ये उभी केली, की ती सेंसर डिटेक्‍ट करेन. याद्वारे स्मार्ट पार्किंगची जी कंट्रोल रूम आहे तेथे कोणत्या वेळेला किती वाहने स्मार्ट पार्किंगमध्ये उभी आहेत याचा डाटा तयार होत आहे. हा डाटा भविष्यात नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

गुगल प्ले स्टोअरला किंवा आयओएसवरून "नाशिक स्मार्ट पार्किंग' हे ऍप

नागरिकांना घरबसल्या पार्किंगसाठी जागेची निवड करता येईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. वाहनधारकांना पार्किंगमध्ये जागा आहे की नाही, यासंदर्भात ऍपद्वारे समजणार आहे. गुगल प्ले स्टोअरला किंवा आयओएसवरून "नाशिक स्मार्ट पार्किंग' हे ऍप डाउनलोड करता येईल. स्मार्ट पार्किंगच्या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज डिस्ल्पेच्या माध्यमातून पार्किंगबद्दलची सर्व माहिती समजेल. 

अशी आहे स्मार्ट पार्किंगची ठिकाणे 

- कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल ऑफिस (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- जेहान सर्कल ते गुरुजी हॉस्पिटल (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- जेहान सर्कल ते एबीबी (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- गुरुजी हॉस्पिटल ते पाइपलाइन रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- मोडक पॉइंट ते खडकाळी रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- शालिमार ते नेहरू गार्डन (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- श्रद्धा पेट्रोलपंप ते वेस्टसाइड मॉल (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- कॅनडा कॉर्नर ते विसेमळा (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- बी. डी. भालेकर हायस्कूल ग्राउंड, शालिमार (ऑफ स्ट्रीट पार्किंग) 
- अण्णा शास्त्री हॉस्पिटल (ऑफ स्ट्रीट पार्किंग)

- कुलकर्णी गार्डनजवळ साधू वासवानी रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूला) 
- ज्योती स्टोर / हृषीकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूला) 
- गंगापूर नाका ते जेहान सर्कल (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूस) 
- प्रमोद महाजन गार्डनच्या पुढील आणि मागील बाजूस (ऑन स्ट्रीट पार्किंग) 
- थत्तेनगर रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT