chana-dal.jpg 
नाशिक

दीड कोटी कार्डधारकांना मिळणार मोफत हरभराडाळ; वाचा सविस्तर

महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील एक कोटी ५३ लाख कार्डधारकांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यासाठी मोफत हरभराडाळ वितरित करण्यात येणार आहे. त्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

छगन भुजबळ : मंत्रिमंडळाची मिळाली मान्यता 
भुजबळ म्हणाले, की कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजनेमधील २४ लाख ५७ हजार, प्राधान्य कुटुंबातील एक कोटी २८ लाख अशा कार्डधारकांना एक किलो अख्खा हरभरा देण्यात येणार होता. त्याऐवजी कार्डधारकास मोफत हरभराडाळ देण्यात येईल. ८६ हजार २५८ टन हरभरा देण्यात येणार होता. मात्र अख्खा हरभरा खाण्याचे राज्यात प्रमाण कमी आहे. तसेच राज्यात आगामी गणेशोत्सव व दिवाळी हे सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन हरभराडाळीला मागणी राहणार असल्याने मंत्रिमंडळाने मान्य केले. त्यामुळे प्रत्येक कार्डला एक किलो मोफत हरभराडाळ दिली जाईल.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Water : मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या; समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन

Babar Azam: बाबर आझमला सेल्फीचा इतका राग आला की... चाहत्याचा मोबाईल घेतला अन् थेट मैदानाबाहेर भिरकावला! नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Gen Z Communication Habits: ऑनलाइन असूनही मेसेजला रिप्लाय नाही! Gen Z च्या या वागण्याचा नेमका अर्थ काय?

Latest Marathi News Live Update: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

Manwath Crime : सोशल मीडियावरील छायाचित्राच्या प्रसाराने अल्पवयीन मुलीने संपविले जीवन; मानवतमध्ये गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT