chagan bhujbal 1212.jpg 
नाशिक

पर्यावरणपूरक शाश्‍वत विकासाला हवे प्राधान्य! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्‍वत विकासाला प्राधान्य द्यावे. तसेच शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

पर्यावरणपूरक शाश्‍वत विकासाला हवे प्राधान्य 

मंत्रालयात नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (ता. 13) नाशिक स्मार्टसिटी प्रकल्पाचे सादरीकरण केले. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा स्मार्टसिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल उपस्थित होते. या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, की नाशिक शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जुने गावठाण ही नाशिकची खरी ओळख आहे. त्यामुळे नाशिककरांच्या मागणीनुसार जुन्या क्षेत्राच्या विकासासाठी 598 एकरांतील जुन्या गावठाणाची निवड करण्यात आली. स्काडा प्रणालीच्या सहाय्याने 24 तास पुरेशा दाबाने व शुद्ध पाणीपुरवठा जुन्या गावठाणामध्ये करण्यात येणार आहे. स्वयंचलित पद्धतीने पुरेसा दाब, विविध ठिकाणी शुद्ध पाण्याची तपासणी, पाणीपुरवठा नलिकांमध्ये "लिकेज डिटेक्‍शन' स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवणुकीसाठी टाक्‍या बांधण्याचा खर्च, वॉटर फिल्टर उपकरणांवरील खर्च तसेच पाणी साठवणुकीच्या प्रवृत्तीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय या गोष्टी टाळणे शक्‍य होणार आहे. त्यातून पाण्याची बचत होऊन सद्यःस्थितीतील 43 टक्‍क्‍यांवरील "नॉन रेव्हेन्यू वॉटर' दहा टक्‍क्‍यांच्या आत आणणे शक्‍य होईल. स्वयंचलित प्रणालीमुळे कोठेही बिघाड झाल्याची माहिती आपोआप नियंत्रण कक्षात समजून ती दुरुस्ती तत्काळ करता येईल. 

गोदावरी नदीच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्‍यक
गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय स्मार्ट शहर होऊ शकत नाही. नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी वेगळे करावे व त्यावर प्रक्रिया करण्यात यावी. नाशिक शहर स्मार्ट बनविताना शहरामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे. -छगन भुजबळ, पालकमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT