Chhagan Bhujbal Latest News esakal
नाशिक

शिवसेना संपू नये, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाची : छगन भूजबळ

विक्रांत मते

नाशिक : शिवसेनेत मोठी फूट पडली असली तरी शिवसेना संपू नये, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाची असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज येथे व्यक्त करताना राज्यातील शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहे हे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार असल्याचे वक्तव्य केले. (chhagan bhujbal reaction on shivsena Maharashtra political nashik news)

राज्यात सत्तांतराची घटना घडल्यानंतर श्री. भूजबळ गुरुवारी (ता. ७) नाशिक मध्ये आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे समर्थन केले. ते म्हणाले, शिवसेना स्थापन झाल्यापासून जवळून विस्तार बघितला आहे. त्यामुळे शिवसेना संपावे, असे माझ्यासारख्या व्यक्तीला कधीही वाटणार नाही, मीच काय महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती शिवसेना संपावी असं म्हणणार नाही. मनातूनही त्याला वाटणार नाही. शिवसेने अंतर्गत वाद आहे तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. मात्र शिवसेने अंतर्गत वाद लवकर संपावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोघांच्या लढाईत काय होईल हे सांगता येत नाही.

मात्र शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहेत हे महत्त्वाचे ठरेल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी शिंदे सरकारने अद्यापही मंत्री मंडळाचा विस्तार केला नाही. यापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये नवी राबिया खटला गाजला होता. सन २०१४ च्या या खटल्यात महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्या तशीच परिस्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यावेळी फुटलेल्या आमदारांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल महत्त्वाचा ठरेल, असे भूजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT