Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sakal
नाशिक

"तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना खाली पाहावे लागल्याचे दुःख"

महेंद्र महाजन

नाशिक : आम्ही तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना खाली पाहावे लागेल, याचं दुःख होते. तुरुंगात असताना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत, असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली. तसेच लोकशाही आहे, खुशाल उच्च न्यायालयात जावे, आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ, असे विरोधकांना त्यांनी प्रतिउत्तर दिले.


महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेले असताना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला उत आणला गेला. नाशिकला आले काय अथवा कुठेही गेले काय, काय झालं? माध्यमांमध्ये किती महत्व मिळालं? असे प्रश्‍न उपस्थित करत भुजबळ यांनी ‘मेरे खिलाफ होनेवाली बातो को मै अक्सर खामोशी से सूनता हुं, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा है’ अशा शब्दात विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आज पालकमंत्री, माजी खासदार भुजबळ हे नाशिकमध्ये आलेत. त्यावेळी भुजबळ फार्ममध्ये ढोल-ताशांच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पेढे वाटण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर आले असतांना नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात फटाके, ढोल ताशा वाजवत, पेढे वाटून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.



यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, समीना मेमन, सुषमा पगारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, महापालिकेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या कविता कर्डक, समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, माजी नगरसेवक हरिष भडांगे, मनोहर कोरडे, संजय खैरनार, मुख्तार शेख, नाना पवार, योगेश कमोद, दिपक वाघ, डॉ.योगेश गोसावी, स्वाती बीडला, महेश भामरे, योगेश निसाळ, शंकर मोकळ, मकरंद सोमंवशी, चिन्मय गाढे, गणेश गायधनी, संदीप गांगुर्डे यांच्यासह यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



ते म्हणाले की, आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे. आज शुभदिनी नाशकात आलोय. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद होणारचं आहे. आमच्यावर कारवाई सुरु असतांना गेल्या ५ वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मन जळत होतं.

भुजबळ पुढे म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो, निवडणुकांच्या वेळी थोडं जास्त बोललं जातं. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो. आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडलेत. राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चाललीय. मात्र आता लोक हुशार झाली आहे. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालंय अशी टीका त्यांनी यावेळी केली.


ते म्हणाले की, केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल. माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व कळतय. जनता सब जानती है. असे सांगत केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. तसेच नाशिक- मराठवाडा पाणी वाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं समन्यायी वाटप आहे. ते त्यानुसार होईल. नाशिक तसेच मराठवाडा कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचबरोबर नाशिकची जलसंपदाची कार्यालयं नाशिकहून कुठेही हलवली जाणार नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT