chhagan Bhujbal
chhagan Bhujbal esakal
नाशिक

ओमिक्रॉनची धास्ती! नाशिकमध्ये 23 तारखेपासून नियम होणार आणखी कडक

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात ओमिक्रॉनचा (Omicron) धोका लक्षात घेऊन येत्या २३ तारखेपासून शासकीय कार्यालय, बाजारसमिती, सार्वजनिक ठिकाणं, मार्केट, आस्थापनांच्या ठिकाणी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली नसल्यास प्रवेश नाही. तसेच ‘नो मास्क नो एन्ट्री’ चा (No Mask No Entry) निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ही घोषणा गुरुवारी (ता. १६) केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात साप्ताहिक कोरोना आढावा बैठक आज झाली, यावेळी भुजबळ यांनी ही घोषणा केली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare), पोलिस आयुक्त दीपक (Deepak Pandey) पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ४०१ रूग्ण आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर आधीपेक्षा कमी झाला आहे. जिल्ह्यात ३७३ टन ऑक्सिजनची सोय, २०० टन ऑक्सिजन खासगी हॉस्पिटल आणि आस्थापनांकडे उपलब्ध होईल. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८६.८४ टक्के लसीकरण झाले असून सध्या लसीकरणाचा वेग कमी झाला आहे, लसीकरणाचा मोठा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात ७८ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला तर केवळ ४० टक्के नागरिकांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे.

जिल्ह्यात ४०१ कोरोना रूग्ण आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर ०.८ टक्के तर मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. परंतु लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. अद्यापही ५० टक्के नागरीकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे आता यापुढे शासकीय कार्यालये, बाजारपेठा, मॉल्स, मल्टिप्लेक्स, सार्वजनिक आस्थापना, कारखाने अशा सर्व ठिकाणी लस नसेल तर प्रवेश नाही, असे निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक आस्थापनांनीही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाईल. व्यावसायिक लहान असो अथवा मोठा सर्वांना नियम सारखेच असतील. विशेष पथकही स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

७१० टनाचे उद्दिष्ट

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला ४०१ टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय, महापालिका व नगरपालिकांनी ३७३ टन व खासगी रुग्णालये तसेच उद्योजकांमधील २०० टन ऑक्सिजन निर्मितीचा समावेश आहे. येत्या काळात हीच क्षमता ७१० टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

नववर्ष स्वागत कार्यक्रमांना बंदी

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांची तपासणी करावी. त्यांचे लसीकरण झाले आहे का, हे पाहावे. फाइव्ह स्टार हॉटेल्स असतील किंवा कोणतेही हॉटेल असतील त्यांना परवानगी देताना अटींची पूर्तता होत नसेल, तर पोलिसांची कारवाई होईल. ज्यांना कार्यक्रम करायचे आहेत, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या १० दिवसांत काय घ्यायचा तो आनंद घ्या.

जिल्ह्याचे चित्र
- पॉझिटिव्ह दर ०.८० टक्यांपर्यत खाली.
- मृत्यूदर २.११ टक्के.
- म्युकरमायकोसिस रुग्णसंख्येत १२ पर्यत घसरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT