Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal, former MP Sameer Bhujbal, former MLA Shivram Jhole, Gorakh Bodke etc.  
नाशिक

Chhagan Bhujbal: अन्याय होत असल्यास गप्प बसणार नाही : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासही आमचा विरोध आहे.

देशातील ५४ टक्के ओबीसी समाजासाठी ३५ वर्षे मी लढलो आणि यापुढेही लढेन. त्यामुळे आमच्यावर अन्याय केला तर गप्प बसणार नाही, असा घणाघात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन सोहळा मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. (Chhagan Bhujbal statement about maratha reservation from obc nashik news)

या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांच्यासह शिवा काळे, प्रशांत कडू, देवराम मराडे, नारायण वळकंद, श्‍याम परदेशी, डॉ. जगताप, कैलास भगत, अशोक शिंदे, भगवान मधे व्यासपीठावर उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ते ओबीसी कोट्यातून देऊ नका. कारण, आधीच तुटपुंजे आरक्षण असून, त्याचे अजून तुकडे होतील.

त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण वेगळे व कायद्याप्रमाणे द्या. जेणेकरून ते कायम टिकले पाहिजे. अंतरवाली सराटीमध्ये आधी पोलिसांवर अत्याचार झाले, ते नाही दिसले का तुम्हाला? त्यानंतर बीडमध्ये आमदारांची घरे जाळली, हॉटेल जाळली, घरे जाळली हे लोकांपर्यंत गेले नाही. लोकांपर्यंत गेला फक्त आंदोलन करणाऱ्यावर लाठीहल्ला आणि आज त्यालाच सहानुभूती मिळत आहे. त्यामुळे मात्र सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे.

आज मी ३७४ जातींचे प्रतिनिधीत्व करीत आहे. मी फक्त वंजारी व माळी यांचे नेतृत्व करीत नाही, तर सर्व ओबीसींचे नेतृत्व करीत आहे. तसेच, मराठा समाजातही काही समजदार लोक आहेत. ‘आम्हाला कुणबी नको, आम्हाला मराठा पाहिजे’ असे त्यांचे मत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष गोरख बोडके यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आगरी समाज, नाभिक व दलित समाज यांनी भुजबळ यांना पाठिंबा दिला. नुकत्याच झालेल्या नवनिर्वाचित सरपंचांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

या वेळी सरपंच शिल्पा आहेर (मोडाळे), सरपंच सुनीता सदगीर (शिरसाठे), सरपंच एकनाथ कातोरे (कुशेगाव), सदस्य गणेश ढोन्नर, मंदाबाई बोडके, ज्ञानेश्वर झोले, सुरेश लहानगे, आशा गांगड, सीताबाई जगताप यांच्यासह स्थानिक नेते अशोक आहेर, रघुनाथ बोडके, हरिदास सूर्यवंशी, भाऊसाहेब सूर्यवंशी, विष्णू कान्हव, निवृत्ती शेंडगे, अंबादास धात्रक आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी सूत्रसंचालन केले.

संभाजीराजेंनाही टोला

भुजबळ यांनी संभाजीराजे छत्रपती यांनाही टोला लगावत फुले- शाहू- आंबेडकर यांना जपणारे शाहू महाराज पाहा आणि तुम्ही काय करता, असे म्हणाले. मला आमदार, मंत्रिपद याची अपेक्षा नाही. मी काम करेल ते गरिबांसाठीच. माझ्याकडे आजपर्यंत कुठल्याही जातीचा माणूस आला तर मी कधी त्याला जात विचारली नाही.

मलाही कधी कोणी जात विचारली नाही. जनतेने मला निवडून दिले, म्हणून त्यांचे काम करणे माझे कर्तव्य आहे. अंबड तालुक्यात झालेल्या सभेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी (ता. १८) झालेल्या सभेत भुजबळांनी त्यांनाही टोला लगावला.

भुजबळ किती जणांना पाडेल?

तुम्ही महाराष्ट्राचा सातबारा घेतला काय? सर्व पुढाऱ्यांना गावबंदी. अरे त्यांना गावात येऊ द्या, बोलू द्या, पटलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या, आणि कोण म्हणते भुजबळांना पाडेल? अरे, पण भुजबळ किती जणांना पाडेल हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे भ्रमात राहू नका, दादागिरी करणे हे धंदे सोडून द्या, आणि एकमेकांची मते जाणून घ्या, असाही सल्ला भुजबळांनी या वेळी दिला.

मोडाळे, शिरसाठे, कुशेगावसाठी १४ कोटींचा निधी मंजूर

तिन्ही गावांसाठी मुकणे धरणातून १४ कोटी रुपयांची लिफ्ट योजना मंजूर केल्याने या भागातील सर्व शेतकरी बागायतदार होणार आहेत, तसेच जिल्हा नियोजनकडून वरील तिन्ही गावांसाठी २४ तास वीज मिळविण्यासाठी निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण झाले आहे. वरील तिन्ही गावांसाठी मॉडेल तलाठी कार्यालय बनविण्यात आले असून, यावर पवनचक्की बसविण्यात आली आहे. याचे लोकार्पणही झाले. यासह मोडाळे, कुशेगावातही विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT