Chhagan Bhujbal, President of All India Mahatma Phule Samata Parishad, was felicitated at a function held at Constitution Club on Sunday. esakal
नाशिक

OBC Reservation News: जातीनिहाय जनगणनेसाठी भाग पाडा : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

OBC Reservation News : एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी येथे केले.

ओबीसींचे हक्क नाकारून देशात एकाधिकारशाही आणत असाल, तर त्याचा आम्ही विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला. (chhagan bhujbal statement on OBC Reservation Force for caste wise census at delhi nashik news)

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ओबीसी महासभेच्या कार्यक्रमात बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान देश कधीच नाकारू शकत नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज राष्ट्रपतिपदापासून सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत.

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पिचलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. देशात जनगणना न होण्यासाठी केंद्र सरकार कोरोनाचे कारण देत आहे.

मात्र आता कोरोनाचे संकट टळत आले असल्याने जनगणना लवकर करून ती जातनिहाय करावी. ज्या समाजाची जेवढी संख्या तेवढा वाटा त्या समाजाला दिला पाहिजे. अनेक योजनांचा लाभ देताना सरकारला लोकसंख्या माहिती नसल्याने अडचणी होतात.

हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. श्री. भुजबळ म्हणाले, की मंडल आयोग लागू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले शरद यादव यांच्या निधनानंतर ओबीसी समाजाला मोठा धक्का बसला.

पण आता त्यांच्यानंतर ही जबाबदारी प्रत्येक ओबीसींनी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. जातींमध्ये विभागले गेलो, तर कोणता लाभ मिळणार नाही. मात्र एकत्रित राहून ओबीसी म्हणून लढलो, तर मात्र निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT