Chhagan Bhujbal News esakal
नाशिक

Chhagan Bhujbal | पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता प्रकल्प अहवाल बनविणार : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : नाशिक ते येवला महामार्गावर पिंपळस ते येवला दरम्यानच्या चौपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी हायब्रीड अॅन्युटी मॉडेल प्रकल्पातून शासनाने मंजुरी दिली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Chhagan Bhujbal statement Pimplas to Yeola four lane road project report to be prepared nashik news)

२००४ ला छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून नाशिक ते येवला या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. या चौपदरी रस्त्यामुळे या मार्गाने वेगाने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना कमीत कमी वेळेत प्रवास करणे शक्य झाले होते.

त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून सदर रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात रस्ता नादुरुस्त झाल्याने अनेक अपघात होत होते. तसेच वाहतुकीस अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रस्त्याच्या नूतनीकरणासाठी छगन भुजबळ यांचे शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू होता.

त्यातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली होती.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दरम्यान सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्प रेंगाळला होता. या प्रकल्पासाठी छगन भुजबळ यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यानंतर सदर प्रकल्पास पुन्हा हायब्रीड अॅन्युटी मॉडेल प्रकल्पातून सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली.

त्यासाठी अर्थसंकल्पातून ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक - निफाड -येवला रस्ता १७९ ते २०९ किलोमीटर म्हणजे पिंपळस ते येवला या भागाचा समावेश आहे.

त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर होऊन या रस्त्याच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी मिळणार आहे.त्यामुळे नाशिक-निफाड-येवला रस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News : हवेची गुणवत्ता वाढल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक

Hingoli Accident : भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; बसची विद्युत खांबाला धडक

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

SCROLL FOR NEXT