Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal News esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : ‘पाणी पुरवठा़’चा पदभार प्रभारींकडे नको : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश देण्यावरून वादात सापडलेल्या विभागास कार्यकारी अभियंता नसल्यामुळे या विभागाचा पदभार बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सोपविण्यात आलेला आहे.

असे असतानाही विभागातील कामकाजाच्या तक्रारी जैसे थे आहेत. त्यामुळे प्रभारी कार्यकारी अभियंत्यांकडून हा पदभार काढून तो विभागातीलच उपअभियंत्यांकडे द्यावा, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. (Chhagan Bhujbal statement responsibility of water supply should not lie with incharges nashik news)

याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना पत्र दिले आहे. त्यावर श्रीमती मित्तल नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. जलजीवन मिशन योजनेतील तब्बल ५१ योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम भांडेकर यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार मालेगावचे उपअभियंता आर. व्ही. महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, आठवडाभरात तो बांधकाम कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

तर, हा पदभार नाशिकचे उपअभियंता डी. एल. अंधारे यांच्याकडे देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाबतंत्राचाही वापर झाला होता. त्यातच अनेकांनी या कार्यकारी अभियंतापदासाठी मंत्रालयातून फिल्डींग लावली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यामुळे कार्यकारी अभियंतापदाचा विभागात खेळखंडोबा झाल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्याकडे पदभार आहे. मात्र, त्यांच्याकडे दोन विभागांचा पदभार असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे दुर्लक्ष व कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच आता माजी मंत्री भुजबळ यांनीदेखील पत्र दिले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागात अनेक कार्यक्षम उपअभियंता असूनही या विभागाच्या कार्यकारी अभियंता या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्यांकडे देणे हे अनाकलनीय वाटते. याबाबत तातडीने पुनर्विचार करून कार्यवाही करावी, असे श्री. भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT