chicken
chicken esakal
नाशिक

कडक लॉकडाऊनमध्ये चिकनची दुकाने बंद; ब्रॉयलर कोंबड्यांच्या भावात घसरण

महेंद्र महाजन

नाशिक : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या (corona virus) विरोधात प्रतिकारशक्ती (immunity) वाढविण्यासाठी चिकन, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ खाण्याची सूचना काही तासांपूर्वी केली, पण राज्यातील १५ ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनच्या ( strict lockdown) कडक निर्बंधांमध्ये चिकन-अंड्यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ब्रॉयलर कोंबड्यांच्या (chicken) भावात किलोला एका दिवसात तीन रुपयांनी घसरण झाली. (chicken shops off nashik marathi news)

कोरोनाविरुद्ध लढ्यात प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्यांची रांगा लावून खरेदी

कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर सकाळी सात ते अकरापर्यंतची वेळ खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाने दिल्याने ग्राहकांनी चिकन आणि अंड्यांच्या दुकानांपुढे रांगा लावून खरेदी केली. राज्यातील ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांच्या माहितीनुसार अकोला, अमरावती, नाशिक, नगर, सासवड, जेजुरी, नीरा (बारामती), वर्धा, यवतमाळ, लातूर, वाशीम, बुलडाणा, उस्मानाबाद, बीड, हिंगोली या भागामध्ये लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांतून चिकन-अंड्यांची दुकाने वगळण्यात आली नाहीत. मुळातच, कोरोनाच्या प्रतिबंधांच्या धोरणाच्या अनुषंगाने अनिश्‍चिततेच्या काळात ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनाकडील हात उत्पादकांनी आखडता घेतला असल्याने पिल्लांच्या किमती निम्म्याने घटल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका पिल्लासाठी ४० रुपये द्यावे लागत होते. आता २० रुपयांमध्ये पिल्लू विकत मिळते. ८५ रुपये किलोवरून मंगळवारी (ता. ११) उत्पादकांना ८२ रुपये किलो भावाने ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री करावी लागली.

दिवसाला १३ लाख कोंबड्यांची विक्री

राज्यात सद्यःस्थितीत दिवसाला १३ लाख ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री होत आहे. ८२ रुपये किलो भावाने विकलेल्या कोंबडीच्या चिकनसाठी ग्राहकांना २२० ते २५० रुपये किलो असा भाव द्यावा लागत आहे. एक अंडे पावणेपाच रुपयांना उत्पादकांकडून खरेदी केले जात असून, ग्राहकांना ते सहा रुपयांना विकत घ्यावे लागते. उन्हाच्या तडाख्यात कोंबड्यांच्या मरण्याचे प्रमाण असताना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ब्रॉयलर कोंबड्यांचे भाव उन्हाळ्यात टिकून राहिल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. सीमावर्ती भागातून गुजरात, मध्य प्रदेशकडे राज्यातून ब्रॉयलर कोंबड्या रवाना होताहेत. आताच्या परिस्थितीत शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातूनही अंडी आणि चिकनला चांगली पसंती मिळत असल्याचे उत्पादकांच्या ध्यानात आले आहे.

किलोचा उत्पादन खर्च ८५ रुपये

ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या पिल्लांची किंमत निम्म्याने कमी झाली असली, तरीही खाद्याचा भाव वाढला आहे. सोयामिलचा दोन महिन्यांपूर्वी टनाचा भाव ३५ हजार रुपये होता. तो आता ७० हजार रुपये झाला आहे. तसेच मक्याचा क्विंटलचा भाव तेराशे रुपयांवरून अठराशे रुपयांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे एक किलो खाद्याचा भाव २७ रुपयांवरून ३५ रुपये झाला. त्यामुळे स्वाभाविकपणे ब्रॉयलर कोंबडीच्या एका किलो उत्पादनाचा खर्च ८५ रुपयांपर्यंत पोचला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंवादाचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्या उद्योगाला बसणार हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिकन आणि अंडी उपयुक्त ठरत असताना हे खाणे आता दुकाने बंदमुळे बंद होणार आहे. त्यातून या उद्योगाला झळा बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसताहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबद्दल गांभीर्याने विचार करून प्रतिकारशक्ती वाढविणारे चिकन-अंडी ग्राहकांना कशी उपलब्ध होतील याविषयी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्याची उत्पादक शेतकऱ्यांची विनंती आहे. -उद्धव आहेर, आनंद ॲग्रो समूह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT