funding esakal
नाशिक

Nashik News : संस्थानच्या विकासासाठी कायमस्वरूपी निधी; मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री भुसे यांची घोषणा

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. (Chief Minister Shinde Guardian Minister Bhuse announced permanent fund for development of institute nashik news)

तत्पूर्वी, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी नाथांच्या चरणी केली. संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

ज्ञानदेव, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई भावंडांचा सतत नामघोष करीत व संत तुकाराम, नामदेव यांचे अभंग गात भक्तिरसात चिंब झालेल्या वारकरी भाविकांनी भल्या पहाटे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. निवृत्तिनाथ यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मंगळवारी (ता. ६) देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते नेहमीची समाधीची पूजा झाली.

त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. समाधीला पंचामृत अभिषेक पूजा व महावस्त्र श्री. भुसे यांच्या हस्ते देण्यात आले. मंदिराचे परंपरागत पूजक व विश्वस्त जयंत महाराज गोसावी व बंधू यांनी पौरोहित्य केले.

पेठ तालुक्यातील रामदास गवळी व पूनम गवळी यांना मंत्र्यांबरोबर पूजेचा मान मिळाला. संस्थानचे विश्वस्त नीलेश गाढवे यांनी मंत्री भुसे यांचा सत्कार केला. त्र्यंबकेश्वरलगतच्या परिसरात सर्वत्र वारकरी भाविकांची गर्दी व भजनाचा आवाज गर्जत आहे. ठिकठिकाणी दिंड्यांच्या फडावर नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांचे दोन दिवस कार्यक्रम आयोजित केले आहेत.

नगरीत मोठ्या प्रमाणात बाहेरून व्यावसायिक आले असून, यात प्रसाद साहित्य, पेढे, ग्रंथ, धार्मिक पोथ्या, विविध प्रकारच्या माळा, मूर्ती व खाद्यपेये, उबदार कपडे यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. करमणुकीसाठी रहाटपाळणे व चक्रीपाळणे आले असून, तमाशा मंडळींनी हजेरी लावली आहे.

दुपारी चारच्या दरम्यान निवृत्तिनाथांच्या चांदीच्या रथात सजविलेल्या पालखीत नाथांची चांदीची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आल्या. उपस्थित भाविकांनी निवृत्तिनाथ महाराजांचा जयघोष केला. पालखी सजविलेल्या रथात ठेवल्यावर या रथात पुढे मानकरी व पारंपरिक दिंड्या आपल्या सदस्यांबरोबर भगवे ध्वज, विणेकरी, टाळ व मृदंग वाजवत रथ नगर प्रदक्षिणा करण्यास निघाला.

समवेत विश्वस्त मंडळ व दिंड्यांचे प्रमुख बेलापूरकर महाराज, देहूकर महाराज, गोसावी बंधू व इतर मानकरी होते. रथ तेली गल्ली, पाटील गल्ली येथून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे आल्यावर त्यातील पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दरवाजाजवळ येताच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी पुष्पहार घालून स्वागत केले.

पालखी नंदी मंदिरास वळसा घालून ओट्यावर ठेवण्यात आली. त्यामुळे श्रींच्या पादुका व प्रतिमा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात नेण्यात आल्या. तेथे भेट घडविण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात फडकरी व वारकरी यांनी कीर्तन केले आणि भजन व अभंग गायले. देवस्थानतर्फे उपस्थित मानकरी लोकांचा त्र्यंबकेश्वराची प्रतिमा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सायंकाळी रथ मेन रोडने निवृत्तिनाथ समाधी मंदिरात परतून नेण्यात आला. शहरातील रथ मार्गावर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. ठिकठिकाणी श्रींना औक्षण करण्यात आले; तर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्री सर्वच ठिकाणी भजन व कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे.

पालिकेतर्फे हरवले व सापडले याबाबत सतत ध्वनिक्षेपावरून घोषणा करण्यात येत होती. यामुळे हरवलेल्या लहान व वृद्ध लोकांना सापडविणे सोपे झाले होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पहाटे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी फार मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांनी हजेरी लावली होती. गौतम धसाजवळ अंधार असल्याने अनेक जण तेथे पडले. दोन महिला पडल्याने जायबंदी झाल्याचे पुण्याचे भाविक रासकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT