Cm Eknath Shinde Survey esakal
नाशिक

CM Shinde on Crop Damage : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; मदतीबाबत मंत्रीमंडळात लवकरच निर्णय : मुख्यमंत्री शिंदे

सकाळ वृत्तसेवा

CM Shinde on Crop Damage : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला. (Chief Minister Shinde statement on unseasonal rain crop damage Government with farmers Cabinet decision regarding aid nashik news)

बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी दि. 8 एप्रिल,2023 रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी.,

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी. एस. कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT