uddhav ahire.jpg 
नाशिक

मेहनतीचे चीज झाले! डॉक्टरच्या ड्रायव्हरची मुले होणार डॉक्टर; गोष्ट जिद्द आणि चिकाटीची

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर. संसार म्हटलं की थोडे चढ-उतार येणारचं. आपल्यासाठी तर कधी आपल्यांसाठी कष्ट तर करावेच लागणार. असंच काहीसं आहे सटाणा तालुक्यातील वाशेगाव येथील रहिवासी असलेले उद्धव अहिरे बाबतीत...एकदा वाचाच

डॉक्टरच्या वाहनचालकाची मुले होणार डॉक्टर...

उद्धव अहिरे हे मुळचे सटाणा तालुक्यातील वाशेगाव येथील रहिवासी. गावाकडे त्यांची तीन एकर शेती होती. शिक्षण अवघे दहावी पास. लग्न झालं तीन सोन्यासारखी लेकरं झाली. मुले अतिशय हुशार. प्रत्येक परिक्षा, स्पर्धेत अव्वल. जसं जसं मुले मोठी होऊ लागली त्यांची हुशारी बघून मुलगी चेतना, दुसरा मुलगा चेतन व लहान मुलगा गौरव यांच्या उज्ज्वल  भविष्यासाठी उद्धव अहिरे गावातील शेती सोडून काही वर्षांपूर्वी नाशिक येथे स्थायिक झाले.
Ola कंपनीत चालकाचे काम करून दिवस रात्र मेहनत केली. उद्धव अहिरे हे डॉक्टरचे वाहनचालक आहेत. त्यांची तीनही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण व संस्कार दिले. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून तीनही मुलांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आपल्या वडिलांच्या मेहनतीला फळ म्हणून तिघांनाही बारावी सायन्सनंतर CET मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन मेडिकलसाठी विनामूल्य प्रवेश मिळाला.

विशेष म्हणजे मुलांनी देखील जिद्द व चिकाटीने शिक्षण घेत प्रगती केली आहे. मुलांचे शिक्षण त्यांचा स्कॉलरशिपने होत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव अहिरे हे डॉक्टरचे वाहन चालक आहेत. आणि आता त्यांचे मुले लवकरच डॉक्टर होतील. ही बाब अगदी मनाला स्पर्श करणारी आहे. आई-वडीलांच्या काबाड कष्ट, मेहनतीची हीच तर खरी पोच पावती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT