शरद पाथरे.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक! "अकरा वर्षाच्या सेवेत कामकाजावरून मुलांनी प्रथमच रडविले"...मन हेलावणारी आपबीती

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

नाशिक/मालेगाव : 16 एप्रिलपासून आजपर्यंत सलग तेवीस दिवसांपासून रात्रंदिवस ते काम करताय. घरदार काही माहित नाही. पत्नी, मुलांशी फोनवर व्हिडीओ कॉलने संवाद तेवढा होतो. चिमुकले मुलगी, मुलगी पप्पा घरी केव्हा येणार? असं जेव्हा विचारता त्यावेळी अश्रू अनावर होतात. अकरा वर्षाच्या कार्यकाळात काम करतांना प्रथमच रडलो. असे कोरोना फायटर्स असलेल्या शरद पाथरेने 'सकाळ'शी सांगितले. 

विश्रांतीला वेळही मिळत नाही

आरोग्य विभागाच्या सेवेत सन 2009 मध्ये शरद पाथरे कामावर रूजू झाले. अकरा वर्षाच्या सेवाकाळात शेकडो जणांचे शवविच्छेदन केले. कधी डगमगले नाही. सेवाभाव मानून शवविच्छेदन करत राहिले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून, चाळीसपेक्षा अधिक कोरोनाबाधित व संशयितांच्या मृतदेहांचे रँपींग केले असे त्यांनी सांगितले. अनेक गंभीर प्रसंग आले, थकवा आला पण कोरोनाबाधित व कोरोना संशयित मृतदेहाचे प्लॅस्टिक किट रँपींग करतांना फार काळजी घ्यावी लागते.सामान्य रूग्णालयात असतांना विविध दुर्घटना, जळीत, अपघात, खून, यासह शेकडो जणांचे शवविच्छेदन त्यांनी केले. सन 2015-16 ला झालेल्या अपघातात ठार झालेल्या चौदा जणांचे एकाचवेळी शवविच्छेदन केले. कधी डगमगले नाही. पण आता कुटुंबियांना काळजी वाटते.

चौकोनी कुटुंबात मुलगी हमखास रडवते

कोरोना संसर्ग काळात जीवन, फरहान, मन्सुरा, म्हाळदे या विविध रूग्णालयात जाऊन मृतांचे रँपींग केले. सुरवातीला मुर्तुजा अन्सारी हा सहकारी होता. त्याचे आईचे निधन झाल्याने गेली पंधरा दिवस तोदेखील नाही. शरद यांच्या एकट्यावर जबाबदारी असल्याने विश्रांतीला वेळही मिळत नाही. सामान्य रूग्णालयात त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. फावल्या वेळेत ते पत्नी जयश्री, मुलगा जयेश (6) व मुलगी त्रिशा (4) यांच्याशी बोलता. चौकोनी कुटुंबात मुलगी हमखास त्यांना रडवते. यामुळे जास्त बोलणही ते टाळता. डबल-ट्रिपल ग्लोज व मास्क, किट घालून रँपींग करता. तत्पूर्वी मृतासह, काँट सर्व साहित्य निर्जंतुकीकरण केले जाते. सात फुटी बँगेतील तीन लेअर प्लॅस्टिक कव्हरमध्ये मृतदेह गुंडाळून शववाहिकेत पोहोचवता. 

मला कुठलेही साहित्य, वस्तूची कमी भासायला नको अशा सुचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. यामुळे सर्व साहित्य उपलब्ध होते. तरी सर्व खबरदारी व काळजी घ्यावी लागतेच. नागरिकांनी काळजी घ्यावी, घरी थांबावे. प्रशासनाला सहकार्य करावे हीच अपेक्षा, म्हणजे कोरोना लवकर संपेल व आमचीही लवकर सुटका होईल अशी आशा आहे. - शरद पाथरे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT