cicada.jpg 
नाशिक

VIDEO : ज्येष्ठ सांगतात...मादीला साद घालताच 'त्यांचा' आवाज वाढला.. म्हणजे पावसाचे आगमन लवकरच!'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : दाट जंगलात मेमध्ये ऐकायला मिळणारा 'तो' आवाज लॉकडाऊनमध्ये शहरापर्यंत पोचलाय...शहरात दिवसा झाडांमधून येणारा किर्रर्र आवाज हा रातकिड्याचा नसून तो सिकाडा या किटकाचा आहे. सिकाडाचा किरकिराट विणीच्या हंगामात मादीला साद घालण्यासाठी सुरू असतो. त्याचा आवाज जसा वाढतो, तसे तापमान वाढते व पाऊस लवकर येण्याचा संकेत मिळतात, असे ज्येष्ठ सांगतात.

हे सिकाडाच्या अधिवासाला घातक

सिकाडा कीटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रौढावस्थेतील कीटकाचे आयुर्मान अल्प असते. काहीवेळा मादीसोबत मिलनानंतर नर सिकाडा गतप्राण होतो. मुंबईतील तरुण संशोधकांनी सिकाडाच्या पाच प्रजाती शोधून काढल्या होत्या. जैवीक अन्नसाखळीत सिकाडा कीटकाला महत्त्वाचे स्थान आहे. पक्षी आणि सरपटणाऱ्या जीवांच्या भक्ष्यामध्ये त्यांचा समावेश आहे. सिकाडाविषयी देशात अपेक्षित अभ्यास झालेला नाही. वृक्षतोड, मातीची झीज आणि शहरीकरण हे सिकाडाच्या अधिवासाला घातक असल्याचे मत अभ्यासकांचे आहे. 

सिकाडाची वैशिष्टय़े -

* 'सिकाडा'चा किरकिराट विणीच्या हंगामात मादीला साद घालण्यासाठी सुरू असतो.

* या कीटकाची प्रजननाची प्रक्रिया मुख्य करुन तीन प्रक्रियेमध्ये पूर्ण होते.

* झाडांवर घातलेल्या अंडय़ामधून लारवा जमिनीवर पडतो. त्यानंतर या लारव्याची पौढत्वापर्यंतची पूर्ण वाढ ही जमिनीखालीच होते. पूर्ण वाढ झालेला लारवा जमिनीवर आल्यानंतर तो आपल्या विशिष्ट कोशामधून बाहेर पडून झाडांवर अधिवास करतो.

* प्रौढावस्थेतील या कीटकाचे आयुर्मान फार अल्प असते. काही वेळा मादीसोबतच्या संभोगानंतर नर सिकाडा गतप्राण होतो.

गेल्या काही दिवसांपासून सिकाडा कीटकाचा आवाज ऐकू येत आहे. जसे तापमान वाढते तसे त्याचा आवाज वाढतो. तो तोंडाने आवाज काढत नसून शेपटीजवळ अवयव हलवून तो आवाज काढतो. या कीटकाचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे. - डॉ. जयंत फुलकर (निसर्गप्रेमी) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT