Smocking esakal
नाशिक

सामुहिक धूम्रपानाने कॉलेज रोडचे नागरिक त्रस्त

विनोद बेदरकर

नाशिक : कॉलेज रोडवर (College Road) पाटील लेन भागातील सोसायट्यांमधील नागरिक युवकांच्या सामूहिक धूम्रपानाने त्रस्त आहेत. शहरभर फिरून आल्यानंतर पाटील लेन चारमधील आवारात येऊन सिगारेट ओढत (Cigarette Smocking) बसणाऱ्यांचा उपद्रव काही दिवसांपासून वाढला आहे. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने नागरिक हैराण आहेत. (Citizens of College Road suffer from mass smoking Nashik News)

कॉलेज रोड परिसरात पाटील लेन भागातील सोसायट्यालगत लहान- मोठे चहा टपऱ्या आणि दुकान आहेत. दिवसभर तेथे नागरिकांचा राबता असतो. मात्र, हा राबता त्या भागातील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. युवकांचे जथेच्या जथे आडोसा शोधत त्या भागातील सोसायट्यांच्या आवारात सिगारेट ओढत बसतात. नुसते सिगारेट पुरते एकवेळ समजून घेता येते, मात्र आता सिगारेट फुंकणाऱ्यांचे आडोसे या भागात तयार होऊ लागल्याने गांजा फिरणाऱ्याचा उपद्रव वाढल्याचे या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आहे.

पाटील लेन क्रमांक चार भागातील काही रहिवाशांनी याविषयी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या भागात येऊन तेथील दुकानदारांना समज दिली. त्यावर दुकानदारांनी येथे थांबू नये असे फलक लावून स्वतःची सोडवणूक करून घेतली. सिगारेटसह तत्सम तंबाखूजन्य पदार्थाचे धूम्रपानाचा सामान्यांचा त्रास काही संपला नाही, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. दिवसभर सामूहिक चालणाऱ्या या धूम्रपानास युवक आणि युवतीचा राबता असतो. त्यामुळे जणू हे सिगारेट ओढण्याचे ठिकाण अशा थाटात रात्री उशिरापर्यंत कुणीही यावे फुंकत बसावे, असे या भागातील सोसायट्यातील चित्र झाले आहे.

रात्री उशिरापर्यंत गर्दी होऊ लागली असून, प्रसंगी हाणामारीसारखे प्रकार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारी करूनही पोलिस अधूनमधून पाहणी करतात. मात्र तिथे होणाऱ्या गर्दीमुळे कॉलनी रस्त्यावर रहदारीत अडथळे निर्माण होतात. अल्पवयीन मुले- मुली राजरोस धूम्रपान करतात. रहिवासी क्षेत्रातील अनधिकृत दुकानाकडे महापालिकेने काणाडोळा केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT