Citylinc news esakal
नाशिक

Nashik News : तपोवन टर्मिनल लवकरचं कार्यान्वित; 50 इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगची व्यवस्था

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सिटी लिंक बस सेवेसाठी पंचवटी विभागातील तपोवन डेपो येथे टर्मिनल उभारणीचे काम सुरू असून मात्र धीम्या गतीने सुरू असलेले काम डिसेंबर अखेरीस पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या डेपो मध्येच ५० इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणी केली जाणार असून चार्जिंग स्टेशन उभारण्याची जबाबदारी बस ऑपरेटर वर टाकण्यात आली आहे. (citylinc Tapovan Terminal to be operational soon Arrangement of charging 50 electric buses Nashik News)

महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सन २०२१ पासून शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. सिटीलिंक कंपनीकडे ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवेचे संचलन केले जाते. बससेवेकरीता नाशिकरोड व पंचवटीतील तपोवनातील साधुग्रामच्या जागेत बस डेपो व टर्मिनलची उभारणी केली जात आहे. तपोवन डेपो व टर्मिनल उभारणीसाठी तीस कोटी रुपये खर्च केले जात आहे. दिडशे डिझेल व पन्नास ५० इलेक्ट्रीक बसेस उभे करण्याची क्षमता तपोवन डेपोची आहे.

बस टर्मिनलमध्ये पार्किंग, वर्कशॉप, चालक-वाहक विश्रांती कक्ष, कॅश काऊंटर, व्यावसायिक गाळे उभारले जात आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक) वसंत गायधनी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, संदेश शिंदे, उपअभियंता प्रकाश निकम आदींनी तपोवन डेपोची पाहणी केली. सद्यःस्थितीत विद्युत विषयक कामे शिल्लक आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जानेवारीच्या मध्यावर तपोवन डेपो व टर्मिनल खुले केली जाणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पन्नास बसेससाठी चार्जिंग स्टेशन

शासन व महापालिकेच्या संयुक्त निधीतून पन्नास इलेक्ट्रिकल बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. तपोवन डेपोमध्ये इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. इलेक्ट्रिक स्टेशन उभारण्याची जबाबदारी बस ऑपरेटर्सची राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT