esakal
नाशिक

ठेकेदाराच्या मनमानीला वैतागले सफाई कामगार; पुकारले बमुदत उपोषण

सकाळ वृत्त सेवा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : जुन्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे यासह येथील नगरपरिषदेच्या ठेकदाराकडून होणाऱ्या मनमानी, अन्यायाविरोधात सफाई कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रहार सफाई कर्मचारी युनियनने याबाबत निवेदन दिले असून कर्मचाऱ्यांना कामावर घेईपर्यत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


कर्मचारी मागण्यांवर ठाम

नगरपरिषदेने काही सफाई कर्मचारींना कामावरून कमी केले आहे, त्यांना कामावर घ्यावे ही प्रमुख मागणी आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनात सात जुलै २१ ला मुंबई येथे बैठक झाली होती, तीत मुख्याधिकारी संजय जाधव, कामगार आयुक्त माळी, त्र्यंबकेश्वर सफाई कामगार ठेकेदार सह्याद्री कंट्रक्शन व सर्व सफाई कामगार उपस्थित होते. या बैठकीमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन कामावर हजर करून घेण्याचे आदेश दिले होते. परंतु कामगार आयुक्त व राज्यमंत्री यांच्या आदेशाची अवहेलना करून नगरपालिकेने हजर करून घेतलेले नाही. मंदिर उघडल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेणार असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तेही पाळण्यात आलेले नाही. ठेकेदाराने मुख्याधिकारींनाही न जुमानता बाहेरून नवीन कर्मचारी आणून जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे.

त्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष व नगरसेविका कल्पना लहांगे, त्रिवेणी तुंगार, मंगलाताई आराधी, भाजपचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक विष्णू दोभाडे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष अनंत उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच राहिल असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT