who participated in the cleanliness campaign implemented in the bus terminal on Sunday. G. Public school children and teachers. esakal
नाशिक

Cleanliness Drive: सिन्नर बस टर्मिनल चिमुकल्यांकडून चकाचक! ‘स्वच्छतेसाठी एक तारीख, एक तास’ या उपक्रमात श्रमदान

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : येथील सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलात सेक्रेटरी राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. (Cleanliness Drive Sinner Bus Terminal Sparked by students Shramdon in initiative One Date One Hour for Cleanliness nashik)

प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे, बसस्थानक प्रमुख सुरेश दराडे, वाहतूक निरीक्षक भरत शेळके, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अण्णा पवार, लेखाकर गोरख साबळे, एसटी कामगार सेनेचे नाशिक विभाग सचिव देवा सांगळे, विलास केदार, सचिन सांगळे, दया बैरागी, नीलेश कर्पे,

रुपेश टोपी यांच्या उपस्थितीत एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागतील इयत्ता चौथीच्या छत्रपती शिवाजी महाराज कब पथक व राणी लक्ष्मीबाई बुलबुल पथकातील असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख, एक तास’ या उपक्रमात श्रमदान करत बसस्थानक चकाचक केले.

राजेश गडाख यांनी स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसर स्वच्छतेचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी ते अनेक थोर राष्ट्रपुरुष, साधू संतांनी स्वच्छतेचे आपल्याला धडे घालून दिले आहेत, असे सांगितले.

कब बुलबुलमधील विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा अभियान राबवून समाजजागृती केली. ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’, ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘स्वच्छतेचा संदेश ध्यानी धरू’, ‘आपले आरोग्य निरोगी बनवू’, ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’, घोषणा देत बसस्थानक परिसर स्वच्छ केला.

या अभियानाचे नियोजन शिक्षक बापू चतुर, जिजा ताडगे, सुधाकर कोकाटे, गणेश सुके, नीलेश मुळे यांनी केले. त्यांना शाळेतील भास्कर गुरूळे, पांडुरंग लोहकरे, सागर भालेराव, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, अमोल पवार, मंदा नागरे, पद्मा गडाख, सुवर्णा वारुंगसे, योगेश चव्हाणके, शिवाजी कांदळकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT