trimbakeshwar.jpg
trimbakeshwar.jpg 
नाशिक

उद्यापासून त्र्यंबकेश्‍वरमध्ये पुन्हा कडकडीत लॉकडाउन!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (त्र्यंबकेश्‍वर) येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने खडबडून जाग आलेल्या पालिकेने या कालावधीत कडकडीत लॉकडाउनचे आवाहन केले आहे. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सोमवारी (ता. १३) संयुक्त निवेदन काढून ग्रामस्थांना लॉकडाउन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

कडक अंमलबजाणीचा निर्णय

त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण नऊ प्रतिबंधित क्षेत्रे असून, दोन हजार ११२ कुटुंबीय संचारबंदीत आहेत. तेथील व्यवस्थेसाठी पालिकेने १४ वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने खडबडून जाग आलेल्या पालिकेने १५ ते २८ जुलैला कडकडीत लॉकडाउनचे आवाहन केले आहे. मंदिर तीन महिन्यांपासून बंद असल्याने बाहेरील पर्यटक येत नसले, तरी बाहेरील विक्रेते आणि कामगारांची संख्या जास्त आहे. आजूबाजूच्या भागातील लोकांचे रोजगार बुडाल्याने लोक कामासाठी त्र्यंबकेश्‍वर शहरात येऊ लागल्याने पालिकेने कडक अंमलबजाणीचा निर्णय घेतला आहे.

तालुक्‍यात आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३६
आज नव्याने आढळलेल्या पॉझिटिव्ह १
त्र्यंबकेश्‍वर नगर परिषद क्षेत्र १६
तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र २०
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण २६
कोरोनामुळे झालेले मृत्यू १
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल ६
कोविड रुग्णालयात दाखल रुग्ण १
खासगी रुग्णालयात दाखल रुग्ण २
तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह ९
अहवाल यायचे बाकी रुग्ण २५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT