Shiv Sena's Shinde group party inspector Hemant Pawar speaking in the review meeting of officers of Madhya Nashik Assembly Constituency.  esakal
नाशिक

Nashik Shinde Group : ठाण्यानंतर शिंदे गटाचे नाशिककडे लक्ष; निरीक्षक पवार यांच्याकडून मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिककडे विशेष लक्ष आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीत. विकासकामे जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन नाशिकचे पक्ष निरीक्षक हेमंत पवार यांनी केले.

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी आढावा बैठक मु. श. औरंगाबादकर सभागृहात झाली. (CM Eknath Shinde is paying special attention to Nashik news)

श्री. पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेसाठी विविध योजना राबवत असून, अठरा तास काम करत आहेत. ठाणे जिल्ह्यानंतर त्यांचे सर्वाधिक लक्ष नाशिक जिल्ह्यावर आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी काय देता येईल, यासाठी त्यांच्या विविध विभागांशी चर्चा सुरू आहे. लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री नाशिकमध्ये येणार आहे.

माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, मेघा साळवे, अस्मिता देशमाने, जिल्हा संघटक योगेश चव्हाणके, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, सचिन भोसले, नितीन साळवे, योगेश म्हस्के, मध्य विधानसभा उपजिल्हाप्रमुख शशिकांत कोठुळे आदी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले, मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात सर्वधर्मीय लोकांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार फार थोड्या मतांनी पराभूत झाले. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी बघता मध्य नाशिक विधानसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. मध्य नाशिक मतदारसंघामधील ११ विभागप्रमुख, १८ उपविभागप्रमुख, ३३ शाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यांना मिळाले नियुक्तीपत्र

मध्य नाशिक विभागप्रमुख - प्रसाद जोशी, देविदास बागूल, संदीप जाधव, तेजस कर्पे, काशीद पिरजादे, प्रशांत निचळ, आकाश गरुड, राजाभाऊ पवार, हेमंत पापळे, आशिष सुनील चिडे, इनायत शाह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT