Gurumauli Annasaheb More Neighbor Abasaheb More, Guardian Minister Dada Bhuse etc. while welcoming Chief Minister Eknath Shinde at the Agricultural Festival on Sunday.
Gurumauli Annasaheb More Neighbor Abasaheb More, Guardian Minister Dada Bhuse etc. while welcoming Chief Minister Eknath Shinde at the Agricultural Festival on Sunday. esakal
नाशिक

CM Eknath Shinde | शेतकरी, सामान्यांचा विकास हेच धोरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कृषी महोत्सवाचा शेतकरी हाच केंद्रबिंदू असून नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी असे महोत्सव आवश्‍यक आहेत.

राज्यातील साडेबारा कोटी शेतकरी व सामान्य जनतेचा विकास हेच आमच्या सरकारचे धोरण व ध्यास आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. २९) केले. (CM Eknath Shinde statement at swami samarth agriculture festival Development of farmers common people is policy nashik news)

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर पाचदिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज येथे मांडण्यात आलेल्या विविध स्टॉल्सला भेटी दिल्या. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना उपक्रमाचे कौतुक करताना गुरूमाऊलींच्या अशा उपक्रमांनी अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

व्यासपीठावर गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री दादा भुसे, आयोजक आबासाहेब मोरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, बबनराव लोणीकर, भरत गोगावले, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

समाजाविषयी आपुलकी व जिव्हाळा असलेले आयोजक असताना कार्यक्रम यशस्वीच होतात, असे प्रशस्तीपत्र देत महोत्सवातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याचे सांगितले.

राज्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याने त्यांनी सांगितले. राज्यातील साखर उद्योग अडचणीत आलेला असताना मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

महोत्सव दिशादर्शक : अण्णासाहेब मोरे

समर्थ सेवामार्गप्रणित पाच दिवसीय महोत्सवाला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला. हा महोत्सव खऱ्या अर्थाने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी दिशादर्शक ठरल्याने गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांचीही माहिती दिली. गुरूमाऊली बोलत असताना उपस्थितांनी त्यांना हात उंचावून दादही दिली.

महोत्सवाची सांगता

औरंगाबाद दौऱ्यावर निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाला धावती भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. गेल्यापाच दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. सांगता समारंभास मुख्यमंत्र्यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी पोलिसांनी काही भागात नाकाबंदी केली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही अनुभवण्यास मिळाली. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला, परंतु संवाद न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT