uddhav thakre 1.jpg 
नाशिक

"त्यांच्या" गुंडागर्दीमुळे चक्क मुख्यमंत्र्यांनी बदलला मार्ग!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्या हाणामारीच्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रविवारचा दौरा अचानक रद्द करावा लागल्याची बाब समोर आली आहे. चुंभळे यांच्या गुंडागर्दीचे किस्से सकाळी अधिकाऱ्यांनी पुराव्यासह मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर बाजार समितीमधील शिवभोजन थाळी उपक्रमाची पाहणी रद्द करून त्याऐवजी वडाळागाव येथे पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शिवभोजन थाळीची बाजार समितीऐवजी वडाळागावात पाहणी 
बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी संचालक संपत सकाळे यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शनिवारी अविश्‍वास ठराव दाखल करण्यावरून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा असल्याने त्यात बाजार समितीमधील शिवभोजन थाळीच्या उपक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादाची पाहणी त्यांच्याकडून होणार होती. परंतु चुंभळे यांच्या हाणामारीचे किस्से मुख्यमंत्र्यांसमोर गेल्याने त्यांनी बाजार समितीऐवजी अन्य ठिकाणी पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

हाणामारीचे किस्से मुख्यमंत्र्यांसमोर 

चुंभळे सध्या शिवसेनेत आहेत. त्यांच्या पत्नी कल्पना चुंभळे शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हाणामारीचे प्रकार झाल्याने मुख्यमंत्र्यांना टीकेला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागल्याचे समजते. मुख्यमंत्री बाजार समितीत आले असते, तर शेतकरी, व्यापाऱ्यांच्या समस्या मांडता आल्या असत्या. परंतु चुंभळे यांच्या हाणामारीच्या प्रकारामुळे समितीचे नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गात नाराजी निर्माण झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT