Winter Season esakal
नाशिक

Nashik News : थंडी परतली, ओझर 4.9 अंशावर

सकाळ वृत्तसेवा

निफाड : काही दिवसापासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून ओझर येथे सर्वाधिक कमी ४.९ अंश सेल्सिअस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरपेक्षा निफाड थंड असल्याची अनुभूती येत असून कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर ६.३, साकोरे मिग ५.२ तर ओझर ४.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे येत असल्याने थंडीचा कडाका वाढल्याने निफाडचा पारा १७.१ अंशावरून थेट ४.९ अंशापर्यंत घसरला आहे. कडाक्याच्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवत आहेत. (Cold returned Temperature dropped to 4.9 degrees Nashik News)

दुसरीकडे थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. थंडी अशी टिकून राहिली तर द्राक्षबागेवर भुरी, डाऊनी रोगाचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय द्राक्षबागांच्या पक्क्या मणींना तडे जाण्याची शक्यता आहे. वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा, लसूण, ज्वारी पिकांना फायदेशीर ठरणार आहे.

"द्राक्षबागांची कामे सध्या सुरू आहेत. द्राक्षमालाला आकार येण्यासाठी मेहनतीचा काळ सुरु आहे, मात्र कडाक्याची थंडी द्राक्षमालाच्या आकारमानावर परिणाम करत आहे. यावर उपाययोजनेसाठी शेकोटी करणे, पहाटे द्राक्षबागेस पाणी देणे असे उपाय केले जात आहेत. त्यासाठी अखंडीत वीजदेखील मिळणे आवश्यक आहे."

-ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग.

"थंडीमुळे शेतीच्या कामांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच वस्तीवर बांधलेल्या पशुधनाला थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळ सायंकाळ शेकोटीची ऊब द्यावी लागत आहे."

- योगेश अडसारे, शेतकरी

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

असे तापमान घसरले

- ६ डिसेंबर : १७.१

- ७ डिसेंबर : १४.५

- ८ डिसेंबर : १३.१

- ९ डिसेंबर : ७.२

- १० डिसेंबर : ६.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT