Nashik District Collector Gangatharan D. esakal
नाशिक

Nashik: भेसळयुक्त निविष्ठा पुरवठा करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करा : जिल्हाधिकारी गंगाथरण. डी यांचे बैठकीत आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कृषी विभागाने तपासणीचे प्रमाण वाढवताना अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठा पुरवठा करणाऱ्यावर कठोर कारवाई करताना वेळ पडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा.

यासाठी पोलिस प्रशासनाने कृषी विभागास मदत करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरण. डी यांनी दिले आहे. (Collector Gangatharan D order in meeting to File cases directly against suppliers of adulterated inputs Nashik)

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.२६) कृषी निविष्ठा पुरवठा व विक्रीबाबत जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

कृषी आयुक्तालयाने दिल्याप्रमाणे खतांचा पुरवठा जिल्ह्यास करण्याबाबत तसेच कंपनीचे इतर उत्पादनांची लिंकिंग न करण्याबाबत खत कंपनी प्रतिनिधी यांना आदेशित करण्यात आले.

बैठकीस उपस्थित नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन प्रतिनिधींना कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्याचे तसेच गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठा करण्याचे आवाहन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, अशी सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली. नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर वाढवण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करणे आवश्यक असून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी चित्ररथाद्वारे माहिती देणे उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी इफ्को कंपनीच्या चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे,

कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट, मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक जगन सूर्यवंशी, एमआयडीसीचे रवींद्र पाटील, नाशिक डीलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधी, खते व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

२० परवाने निलंबित

कृषी विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा देताना जिल्ह्यात कृषी विभागाची १६ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे.

तपासणीतील त्रुटीच्या अनुषंगाने आतापर्यंत २० परवाने निलंबित केल्याची माहिती दिली. तसेच खताचे ४६, बियाणाचे १६६, तसेच कीटकनाशकांचे ४ विक्री केंद्र बंदचे आदेश आतापर्यंत दिल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT