Admission 
नाशिक

कागदपत्रांअभावी प्रवेशात अडथळे आणू नका! कृषी प्रवेशासंदर्भात सीईटी सेलच्‍या महाविद्यालयांना सूचना 

अरुण मलाणी

नाशिक : बारावीनंतर कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेच्‍या पहिल्‍या फेरीत विविध अडचणी आल्‍याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्‍या जात होत्या. या पार्श्‍वभूमीवर सीईटी सेलमार्फत महाविद्यालयांसाठी सूचना जारी केली आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्‍या पूर्ततेच्‍या मुद्यावर प्रवेशात अडथळे आणू नये, असे बजावले आहे. 

सीईटी सेलने जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे, की केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्‍या पहिल्‍या प्रवेश फेरीत वाटप झालेल्‍या उमेदवारांना संबंधित महाविद्यालयात उपस्‍थित राहून प्रवेश घेणे अडचणी होत आहे. उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्‍हणून प्रवेशवाटप यादीनुसर महाविद्यालय स्‍तरावर प्रवेश देताना उमेदवाराची वस्‍तुस्‍थिती विचारात घेत निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 

..तर त्‍यांना प्रवेश द्यावा

प्रवेशवाटप पत्रावर नमूद केलेल्‍या माहितीनुसार (प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ता आदी) उमेदवाराने कागदपत्रे अपलोड केलेली नसल्‍यास, मात्र प्रवेश देताना उमेदवाराकडे मूळ कागदपत्रे उपलब्‍ध असतील, तर त्‍यांना प्रवेश द्यावा. केवळ कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा चुकीच्‍या ठिकाणी अपलोड केलेली आहेत, असे कारण देत प्रवेश रद्द करू नये. याबाबतची मूळ कागदपत्रे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्‍या मंजुरीपर्यंत महाविद्यालयांनी जतन करून ठेवावीत. प्रवेशप्रक्रिया संपल्‍यानंतर महाविद्यालयांनी अशी प्रकरणे स्‍वतंत्ररीत्‍या राज्‍य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या आयुक्‍तांना सादर करावीत. तात्‍पुरत्‍या गुणवत्ता यादीत नमूद केलेला प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबी आदी संदर्भात उमेदवाराने कोणतीही हरकत घेतलेली नसताना, अंतिम गुणवत्ता यादीत प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबींमध्ये बदलाविषयी उमेदवाराची हरकत असल्‍यास शहानिशा करावी व संबंधित छाननी अधिकाऱ्यांच्या समन्‍वयाने योग्‍य सुधारणा महा. आय. टी. ,मुंबई यांनी करावी. सुधारणांनुसार पुढील वाटप फेरी राबवावी, अशा सूचना केल्‍या आहेत. 

दरम्‍यान, यापूर्वी जारी केलेल्‍या वेळापत्रकानुसार दुसरी वाटपयादी रविवारी (ता. ७) जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी गुरुवार (ता.११)पर्यंत मुदत असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT