Anti-gang squad during night patrolling in Dwarka area  esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमध्ये विविध ठिकाणी गुंडाविरोधी पथकाकडून कोम्बिंग ऑपरेशन!

द्वारका, पाथर्डी फाटा आणि नाशिक रोड मध्यवर्ती ठिकाणी गुंडाविरोधी पथकाकडून बुधवार (ता. १७) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : द्वारका, पाथर्डी फाटा आणि नाशिक रोड मध्यवर्ती ठिकाणी गुंडाविरोधी पथकाकडून बुधवार (ता. १७) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या वेळी ३६ गुन्हेगार, टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. (Combing operation by anti gang squad at various places in Nashik Nashik News)

शहरात येणारे प्रवासी नाशिक रोड येथे रेल्वेने येतात, द्वारका भागात ट्रॅव्हल आणि बसने तर पाथर्डी फाटा परिसरात काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर, गुन्हेगारांकडून त्रास दिला जातो.

असे प्रकार टाळण्यासह रात्रीच्या सुरक्षितेत कोणतीही कमी पडू नये. रात्रीचा प्रवासही प्रवाशांना सुरक्षित असावा.

यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने बुधवार रात्री गुंडाविरोधी पथकाने सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे यांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

द्वारका, नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर आणि पाथर्डी फाटा भागात गस्त करून ३६ गुन्हेगार आणि टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. रात्रीची संधी साधत काही रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करत त्रास देत असतात.

अशा रिक्षाचालकांना समज देण्यात येऊन रिक्षाचालकांना असे प्रकार करू नये अशा सूचना दिल्या. कारवाईने रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: FIR न कळणारी लोकं पार्थ पवारांवर आरोप करताय - फडणवीस

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

Eknath Shinde : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ!

Ashish Shelar : ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत’ आशिष शेलार; ‘ध्यास वंदे मातरम्‌चा’ पुस्तकाचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT