Commissioner advises Shiv Sena delegation not to want politics in Corona epidemic Nashik Political News 
नाशिक

कोरोना महामारीत राजकारण नको, आयुक्तांचा शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सल्ला 

विक्रांत मते

नाशिक : गेल्या महिनाभरात शहरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण चाळीस टक्के असून, प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने परिस्थिती उद्‍भवल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे. परंतु आयुक्त जाधव यांनी ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर व चाचण्या वाढविल्याची माहिती देताना कोरोना लढाईत राजकारण न आणता एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

शहरात कोरोनाच उद्रेक वाढला असून, दीड महिन्यात तीस हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधितांच्या संख्येत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. वैद्यकीय विभागाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. बंद केलेले कोविड सेंटर वेळेत सुरू केले नाही, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बेड नसल्याचे कारण देत दाखल करून घेतले जात नाही. दाखल रुग्णांना ऑक्सिजन, बायपॅप व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मुत्युदरात वाढ होत आहे. शहरात चार हजार ८६५ बेड उपलब्ध असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गंभीर परिस्थिती असून, रुग्णांना बेड मिळत नाही. या मुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचा दावा करण्यात आला. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सहा विभागांसाठी विशेष वैद्यकीय अधिकारी नेमावे, स्पेशल फोर्स तयार करावा, शासनाकडून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

आकृतिबंध मंजूर व्हावा; बिटको रुग्णालयात तीनशे बेड 

आयुक्त जाधव यांनी बिटको रुग्णालयात तीनशे बेड वाढ वाढून देत असल्याचे सांगितले. कोविड रुग्णालयाची माहिती मिळण्यासाठी जनजागृती केली जाणार असून, शहरात पाच लाख माहितीपत्रके वाटप केले जाणार आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढविले जाणार असून, सहा विभागांसाठी प्रत्येकी एक फिजिशियन नियुक्त केले जाणार असल्याचे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला माहिती दिली. त्याचबरोबर राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने शासनाकडे महापालिकेचे आकृतिबंध प्रलंबित आहे. त्यास मान्यता मिळाल्यास वैद्यकीय विभागासाठी कायमस्वरूपी पदे भरता येईल, असा सल्ला दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT